महाराष्ट्रातील तरूणांना सरकारी नोकरी मिळणार, 'या' पदासाठी निघाली प्रचंड मोठी भरती!

MPSC ने पशुधन अधिकारी (LDO) आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती निघल्याची घोषणा केली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

महाराष्ट्रात निघाली 'या' पदांसाठी मोठी भरती

महाराष्ट्रात निघाली 'या' पदांसाठी मोठी भरती

मुंबई तक

• 04:51 PM • 06 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

MPSC कडून 'या' पदांसाठी भरती

point

असिस्टंट प्रोफेसर पदासाठी कुठे अर्ज कराल?

point

MPSC च्या पशुधन अधिकारी (LDO) साठी पात्रता

MPSC Notification: अनेकांचं वैद्यकीय किंवा पशुपालन क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न असतं. नुकतंच, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे (MPSC) कडून नवीन भरती संदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. MPSC ने पशुधन अधिकारी (LDO) आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती निघल्याची घोषणा केली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट  mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. 

हे वाचलं का?

एकूण पदे 

या भरतीच्या माध्यमातून राज्यात पशुधन विकास अधिकारी (LDO) ची एकूण 279 पदे आणि असिस्टंट प्रोफेसरची 716 पदे भरली जाणार आहेत. 

शैक्षणिक पात्रता

LDO च्या पदासाठी वेटरनरी (Veterinary Science) किंवा एनिमल हसबेंडरी (Animal Husbandry) मध्ये बॅचलर्स डिग्री असणं आवश्यक आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी एमडी (M.D), एमएस (M.S), डीएनबी ( D.N.B) किंवा पीएचडी अशा डिग्री असणं गरजेचं आहे. यासोबतच, कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून सिनियर रेजिडेंट पदावरील एका वर्षाचा अनुभव देखील मागितला आहे.

हे ही वाचा:  सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्रात 4 महिन्यात महापालिका निवडणुका घ्या! सर्वोेच्च न्यायालयाचे निर्देश

वयोमर्यादा

या पदांसाठी 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील. यामध्ये आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सूट देण्यात येईल. 

पगार

यामधील LDO पदासाठी 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये दर महिन्याचा पगार असेल. तसेच, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 57,700 रुपये ते 1,82,200 रुपये इतका दर महिन्याचा पगार असेल. 

हे ही वाचा: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे होते प्रेमसंबंध, घरच्यांनी दर्शवला विरोध अन् दोघांचा OYO मध्येच...

अर्ज करण्याची प्रक्रिया 

सर्वप्रथम उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर 'Online Application' सेक्शनमध्ये जा. त्यानंतर उमेदवारांनी संबंधित पदाच्या लिंकवर क्लिक करावे आणि नोंदणी करावी. आता उमेदवारांनी अर्ज भरून डॉक्यूमेंट्स अपलोड करावे तसेच, अर्जाचे शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा. 

    follow whatsapp