IPL 2025: अनेकांना मराठी वाटत असलेल्या वैभव सूर्यवंशीचं PM मोदींनीही केलं तोंडभरून कौतुक!

PM Modi On Vaibhav Suryavanshi : आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीची संपूर्ण क्रिडाविश्वात तुफान चर्चा रंगलीय.

PM Narendra Modi On Vaibhav Suryavanshi

PM Narendra Modi On Vaibhav Suryavanshi

मुंबई तक

• 08:29 PM • 05 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

PM मोदींनी वैभव सूर्यवंशीवर उधळली स्तुतीसुमने

point

"वेगवेगळ्या स्तरावर सामने खेळल्यानेही..."

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi On Vaibhav Suryavanshi : आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीची संपूर्ण क्रिडाविश्वात तुफान चर्चा रंगलीय. 14 वर्षांच्या वैभवनं क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सचिन तेंडुलकरसह रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंनी वैभवचं कौतुक केलं. वैभवने युसूफ पठाणचा 37 चेंडूत 100 धावा करण्याचा विक्रम मोडून मोठा पराक्रम केला. वैभव सूर्यवंशी हा अनेकांना मराठी असल्याचं वाटत होतं. पण तो मूळचा बिहारचा आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैभवच्या अप्रतिम कामगिरीचं कौतुक केलं आहे. पीएम मोदी सर्वात तरुण खेळाडू वैभवबद्दल नेमकं काय म्हणाले, याबाबत जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

PM मोदींनी वैभव सूर्यवंशीवर उधळली स्तुतीसुमने

बिहारने खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चं यजमानपद भूषवलं आहे. 4 मे रोजी पटनाच्या पाटलीपूत्र स्टेडियममध्ये खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 चा उद्घाटन सोहळा रंगला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही ऑनलाईन माध्यमातून जोडले गेले होते. याचदरम्यान मोदी वैभवचं कौतुक करत म्हणाले, आपण सर्वांनी आयपीएलमध्ये बिहारचा पूत्र वैभव सूर्यवंशीची उल्लेखनीय कामगिरी पाहिली आहे.

हे ही वाचा >> डोळ्यात अश्रू, काळजात राग घेऊन परीक्षा दिली, वैभवीनं 12 वीला किती टक्के मिळवले?

वैभवने इतक्या कमी वयात एवढा मोठा विक्रम केला आहे. त्याच्या खेळामागे त्याची मेहनत तर आहेच, पण वेगवेगळ्या स्तरावर सामने खेळल्यानेही त्याला मदत मिळाली  आहे. याचा अर्थ जो जेवढा खेळेल, तो तेवढाच खेळेल. या मेसेजनंतर हे स्पष्ट झालं आहे की, नरेंद्र मोदी वैभव सूर्यवंशीच्या शानदार कामगिरीवर प्रभावित आहेत. यामुळेच मोदी वैभवचं कौतुक करण्यात स्वत:ला रोखू शकले नाहीत. 

आयपील 2025 चा 47 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. गुजरातने राजस्थानला 210 धावांचं टार्गेट दिलं होतं. त्यानंतर राजस्थानकडून वैभवने सलामीला उतरून 17 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी केली. अर्धशतक ठोकल्यानंतर वैभवने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आणि 35 चेंडूत शतक ठोकलं.

हे ही वाचा >> HSC Result 2025 : संपूर्ण महाराष्ट्रात मिताली काबराचीच चर्चा! बारावीच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले?

वैभवच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थानने 16 व्या षटकातच विजयाला गवसणी घातली. 35 चेंडूत शतक ठोकणारा वैभव दुसरा खेळाडू बनला आहे. त्याचे पुढे ख्रिस गेल आहे. ज्याने 2013 मध्ये 30 चेंडूत शतक ठोकलं होतं. तिसऱ्या नंबरवर युसूफ पठाण आहे. युसूफने 37 चेंडूत शतक केलं होतं. 

    follow whatsapp