Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?

Maharashtra Board 10th Result Date: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10वीचा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Maharashtra board 10th result Date (फोटो सौजन्य: Grok)

Maharashtra board 10th result Date (फोटो सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 07:33 AM • 06 May 2025

follow google news

पुणे: महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या निकाल अखेर आज (5 मे 2025) जाहीर झाला.  फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा 12 वीचा निकाल हा लवकर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता 10 वीचा निकाल देखील लवकरच जाहीर होईल. असं अंदाज वर्तविण्यात येत आहे.  

हे वाचलं का?

बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर आता 10 वीच्या परीक्षेचा निकाल हा 15 मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतात. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, बारावीचे निकाल 21 मे रोजी आणि दहावीचे निकाल 27 मे रोजी जाहीर झाले.

हे ही वाचा>> SSC Result 2025:  दहावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result

लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत.  त्यांची प्रतीक्षा ही पुढील आठवड्यात संपू शकते. बारावीच्या निकालाची तारीख ही काल (4 मार्च) जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे 10 वीच्या निकालाची नेमकी तारीख देखील आदल्या दिवशीच जाहीर केली जाईल.

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर, साधारणपणे महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. पण यंदापासून हे निकाल लवकरच जाहीर करण्याचं बोर्डाचं धोरण आहे.

SSC Result 2025 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ ही लिंक शोधावी लागेल आणि त्यावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर, एक नवीन विंडो उघडताच, तुम्हाला तेथे आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करावे लागतील आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करावे लागेल.
आता महाराष्ट्र दहावी/बारावीचा निकाल 2025 स्क्रीनवर दिसेल. सर्व तपशील तपासा आणि निकाल डाउनलोड करा.

हे ही वाचा>> CBSE Board Result Date : निकालाची तारीख आली समोर! 'या' दिवशी लागणार सीबीएसई बोर्डाचा दहावी-बारावीचा रिझल्ट

या 9 वेबसाईटवर पाहता येईल निकाल

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. http://hscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

5. https://results.navneet.com

6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results

8. https://www.indiatoday.in/education-today/results 

9. https://www.aajtak.in/education/board-exam-results

मार्किंग सिस्टम म्हणजे काय?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, 75 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळेल, तर 60 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी आणि 45 टक्के ते 59 टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 35 ते 44 टक्क्यांच्या दरम्यान आहे आणि 35 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे अनुत्तीर्ण होतील. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा कंपार्टमेंट परीक्षेला बसावे लागेल.

ऑनलाइन मार्कशीट कशी मिळवायची?

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या गुणपत्रिका ऑनलाइन मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर त्यांचा रोल/सीट क्रमांक आणि त्यांच्या आईचे पहिले नाव प्रविष्ट करावे लागेल. ही माहिती प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिटावर उपलब्ध असेल. तथापि, जर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळाले नसेल, तर तुम्ही तुमच्या शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि सीट नंबरबाबत मदत मागू शकता.

    follow whatsapp