ind vs Pak: पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. यादरम्यान, गृह मंत्रालयाने बऱ्याच राज्यांना 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे. अशा हल्ल्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा वेळी कोणती खबरदारी घ्यायची?, हे जाणून घेण्यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केली जाईल. मात्र, गृह मंत्रालयाने यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश केला आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाहीये.
ADVERTISEMENT
गृह मंत्रालयाच्या सूचना
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते, हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन कधी आणि कसा वाजेल? याबद्दल एक मॉक ड्रिल असेल. देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यासाठी सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा: "तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?
मॉक ड्रिल दरम्यान 'हे' उपाय
मॉक ड्रिल दरम्यान काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वाचवण्यासाठी पुढील उपाय असतील.
ADVERTISEMENT
