मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर; अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?

Ashok Kharat fraud case : भोंदू बाबा अशोक खरातच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 8 वा गुन्हा, अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवून व्यावसायिकाला लुटले..मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन, फर्निचर बनवून घेतले

Ashok Kharat fraud case

Ashok Kharat fraud case

मुंबई तक

26 Mar 2026 (अपडेटेड: 26 Mar 2026, 10:17 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मर्सिडीज गाडी, 21 देशात भ्रमण, फार्म हाऊसवर टर्किश किचन अन् फर्निचर

point

अशोक खरातने व्यावसायिकाला किती लुटलं?

Ashok Kharat fraud case : नाशिकमधील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे संपण्याचे नाव घेत नाहीयेत. अशोक खरात याच्याविरोधात आज (दि.26)  8 वा गुन्हा दाखल झालाय. व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवत कोट्यावधी लुटल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांत दाखल झाला आहे. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी  पुण्यातील व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

यापूर्वी वावी पोलीस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजीस्टिक व तर ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय वाढवण्यासाठी "अवतार पूजा" करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा : चैत्र नवरात्रीची दुर्गा अष्टमी आज, 'या' शुभ मुहूर्तावर करा 'हे' काम.. होईल प्रचंड फायदा!

खरात याने व्यावसायिकाकडून अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कारची मागणी केली केली. मृत्यूची भीती असल्याने व्यावसायिकाने सन 2018 मध्ये MH 15 GL 8181 या क्रमांकाची मर्सडीज बाबाला भेट म्हणून दिली. अवतार पूजा करण्याआधी परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांत भ्रमण करत सिद्ध व्हावे लागेल, सिद्धी न झाल्यास केल्यास नागदेवता दंश करेल अशी अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवली. अशाप्रकारे गुरूसेवा आणि मृत्यूची भीती घालत अमेरिकेत वैद्यकीय उपचाराचा खर्चही करण्यास भाग पाडले. अगदी कर्ज काढून अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29 लाख 81 हजार खर्च जासूद यांनी केला. 2018 पासून डिसेंबर 2025 पर्यत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटले आहे, मुख्य म्हणजे अवतार पूजेसाठी पैसे उकळण्यासाठी भोंदू बाबाने 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजेच्या सुमारास पूजेसाठी बोलावले. इशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस अंधारात नेऊन ईशानेश्वर महादेव नागाच्या रुपात दर्शन देतील, असे भासवून खोटा नाग दाखवून भीती दाखवून फसवणूक केल्याचा दावा ही फिर्यादीत आहे. 

नागदेवतेच्या दर्शनानंतर स्वर्गाचे दुसरे टोक म्हणून ग्रीनलँड व इतर देश भ्रमंती.... 

नागदेवताने दर्शन दिले आता पुढील 5 वर्षात 21 देशात जाऊन तिथला मातीला स्पर्श केल्यानंतरच लॉजेस्टिकचा व्यवसाय सुरू करायला सांगितले. डिसेंबर 2018 साली म्यानमार आणि त्यानंतर जुन-जुलै 2019 साली ग्रीनलैंड देशात बाबाने परदेशवारी केली. त्यानंतर अमेरिका येथे घेवून जाण्याचा आग्रह धरला आणि त्यासाठी येणारा सर्व खर्च करण्यास सांगितले. तेथील एका रुग्णालयात बाबाला त्यांनी चारवेळा घेऊन जात सर्व औषधोपचार व प्रवासासह राहण्याचा एकूण 29 लाख 81 हजार रुपये इतका खर्च बळजबरीने करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जासूद यांना भीती घालून भोंदू अशोक खरात याने पूजा विधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश या देशांना भेट दिली. त्याआधी  म्यानमार, ग्रीनलँडचा दौरा केला. ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना कैलास मानसरोवरला स्वर्गाचे पहिले टोक आणि ग्रीनलँडला स्वर्गचे दुसरे टोक मानतात असे सांगून फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचा ड्रामा केला. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आल्यानंतर जासूद यांनी अशोक खरातकडे खर्च केलेलं पैसे मागितले असता त्याने सिन्नरच्या वावी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच फिर्याद देण्यात आली आहे

 मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामसाठी 1 कोटी 11 लाख रुपये वसूल केले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानचे लाकूड व लोखंडाचे फर्निचर बसविण्यासाठी 49 लाख रुपयांची मागणी केली. इतर सागवानी फर्निचर बनविण्यासाठी 29 लाख रुपये, फार्म हाऊसमध्ये किचन बनविण्यासाठी 42 लाख 50 हजार रुपये उकळले. अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये  8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे दाखल आले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली 57 दिवसानंतर महत्त्वाची अपडेट, पायलटबाबत म्हणाले...