अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

Ashok Kharat Viral Video : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या नव्या पुराव्यांमुळे खळबळ उडाली असून, एका अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या अश्लाघ्य कृत्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Ashok Kharat Viral Video

Ashok Kharat Viral Video

मुंबई तक

22 Mar 2026 (अपडेटेड: 22 Mar 2026, 09:44 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ

point

मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO

Ashok Kharat Viral Video : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या 'कॅप्टन' अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाने केलेल्या कारनाम्यांमुळे खळबळ उडाली आहे... ज्योतिषाच्या नावाखाली महिलांची आणि मुलींची फसवणूक करणाऱ्या या संशयिताचा एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये खरात एका अल्पवयीन मुलीवर उपचाराचा बनाव रचताना दिसत असून, त्या बहाण्याने त्याने पीडितेसोबत अश्लाघ्य कृत्य केल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक उपकरणांचा वापर करून अघोरी पद्धतीने उपचार करत असल्याचे भासवून त्याने या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार व्हिडीओतून समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली असून, खरातच्या काळ्या कृत्यांचा पाढा आता लांबताना दिसत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : बंदुकीचा धाक दाखवून महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, आधी लग्नाचे दिले आमिष... लाज आणणारी घटना

इंटरनेट केबल आणि टेस्टर वापरुन मुलीचा छळ? 

इंटरनेट केबल आणि टेस्टर यांसारख्या तांत्रिक साधनांचा वापर करून तो दैवी शक्तीचा दावा करत असे, मात्र प्रत्यक्षात त्यामागे केवळ विकृत मानसिकतेतून केलेले शोषण असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. पोलीस उपआयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून, जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशोक खरातचे अनेक व्हिडीओ पोलिसांच्या हाती 

अशोक खरातवर यापूर्वीच बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल आहे. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्या पापाचा घडा भरला आणि पोलिसांनी त्याला 18 मार्च रोजी पहाटे ताब्यात घेतले. खरातच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या धाडीत पोलिसांच्या हाती एक महत्त्वपूर्ण पेनड्राईव्ह लागला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला 58 व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु सखोल तपासानंतर ही संख्या आता 100 च्या पार गेली आहे. या व्हिडिओमध्ये अनेक महिलांच्या शोषणाचे पुरावे असल्याची माहिती असून, खरातने स्वतःच्या फायद्यासाठी आणि वासनेसाठी धर्माचा व ज्योतिषाचा आधार घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

साडेसातीचा त्रास संपला, आता फक्त प्रगती आणि आनंद! शनिदेवांच्या कृपेने 'या' राशींचे नशीब उजळणार
 

    follow whatsapp