हॉटेलच्या रुममध्ये तरूणीला घेऊन गेला, अन् नंतर.. बॉयफ्रेंडने कृत्य तुम्हालाही टाकेल हादरवून

Murder Case Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील देवकाली बायपास जवळ असलेल्या गौरी शंकर पॅलेसच्या रुम नंबर 103 मध्ये धक्कादायक घटना घडली.

 जोडप्याचा मृतदेह घरातील नर्सिंग अधीक्षक कंत्राटी कर्मचारी

पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत

मुंबई तक

14 Jul 2025 (अपडेटेड: 14 Jul 2025, 08:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयुष आणि तरुणीसोबत हॉटेल रुममध्ये काय घडलं?

point

पोलिसांनी रुममध्ये काय काय पाहिलं?

point

आयुषने आधी तरुणीला मारली गोळी

Murder Case Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या अयोध्या येथील देवकाली बायपास जवळ असलेल्या गौरी शंकर पॅलेसच्या रुम नंबर 103 मध्ये धक्कादायक घटना घडली. देवरीया येथे राहणाऱ्या 25 वर्षीय आयुष गुप्ताने हे रूम बुक केलं होतं. आयुषसोबत बाराबंकी येथे राहणारी तरुणीही या हॉटेल रुममध्ये गेली. रिपोर्टनुसार, काल दुपारी 12.20 वाजता आयुष हॉटेलमध्ये जातो आणि रुम बंद करतो. यानंतर हॉटेलच्या रुम नंबर 103 मध्ये असं काही घडलं, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या रुममध्ये आयुष आणि तरुणीचा मृतदेह आढळला.

हे वाचलं का?

आयुष आणि तरुणीसोबत हॉटेल रुममध्ये काय घडलं?

प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, आयुषने आधी प्रेयसीच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर त्याने स्वत:ला गोळी मारली आणि दोघांचं आयुष्य संपवलं. पण हॉटेल रूममध्ये कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाहीय. अशातच पोलीस हत्या की आत्महत्या, अशा अँगलने तपास करत आहे.

हे ही वाचा >> तोंडाला काळं फासलेले प्रवीण गायकवाड नेेमके कोण आहेत?

पोलिसांनी रुममध्ये काय काय पाहिलं?

संध्याकाळच्या वेळी हॉटेल स्टाफने रुम नंबर 103 चा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गेट तोडून रुममध्ये दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी पाहिलं की, बेडरूम रक्तात माखलं होतं आणि तिथे तरुण-तरुणीचा मृतदेह पडला होता. अयोध्याच्या पोलिसांनी हॉटेल रूम सील केलं असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

आयुषने आधी तरुणीला मारली गोळी

पोलिसांच्या माहितीनुसार, आयुषने आधी प्रेयसीच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडली. दरम्यान, पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृतांच्या कुटुंबियांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे. 

हे ही वाचा >> नराधमाने मित्राच्या पत्नीलाही सोडलं नाही, मुंबई पोलीस उपनिरिक्षकाच्या पत्नीला 'त्या' रात्री केली जबरदस्ती

पोलिसांनी काय सांगितलं?

या धक्कादायक घटनेबाबत एसपी सिटी चक्रपाणी त्रिपाठी यांनी म्हटलं की, ही घटना गंभीर आहे. याप्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास केला जात आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दुपारी 12 वाजताच्या सुमारास दोघेही हॉटेलच्या लॉबित बोलत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. 

    follow whatsapp