BDS Doctor Viral News : कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटच्या नावावर दोन इंजिनिअरचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागाचा पर्दाफाश झाला आहे. रिपोर्टनुसार, बीडीएस (डेंटल)ची पदवी असणाऱ्या डॉ. अनुष्का तिवारीने स्वत: प्लास्टिक सर्जन असल्याचं सांगत हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक सुरु केलं होतं. परंतु, डॉक्टर तिवारीच्या हलगर्जीपणामुळे दोन इंजिनिअर व्यक्तींचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, फरुखाबाद येथे राहणाऱ्या 32 वर्षीय इंजिनिअर मयंक कटियारने नोव्हेंबर 2024 मध्ये डॉ. अनुष्का यांच्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं. ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर सूज आणि वेदना होऊ लागल्या. डॉक्टरने ही स्थिती सामान्य असल्याचं सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी मयंकची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने त्यावेळी मयंकचं शवविच्छेदन केलं नाही. परंतु, त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मार्च 2025 मध्ये पनकी पावर हाऊसचा 37 वर्षीय सहाय्यक अभियंता विनीत दुबेनं त्याच क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं. ऑपरेशननंतर तो संक्रमित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 15 मार्चला विनीतचा मृत्यू झाला. त्याची पत्नी जया त्रिपाठीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा >> Fact Check : परदेशी महिला आणि साधूचा किसिंग व्हिडीओ तुफान व्हायरल! पण Video खरा की खोटा? क्लिक करून बघा
डॉ. अनुष्का तिवारी यांच्याकडे होती खोटी पदवी
डॉ. अनुष्का तिवारी यांच्याकडे बीडीएसची पदवी आहे. त्यांनी फरीदाबाद येथील मानव रचना डेंटल कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली होती. तिचा पती सौरभ तिवारी, जे एमडीएस आहेत. ते सुद्धा या क्लिनिकमध्ये सामील होते. क्लिनिकच्या बोर्डवर हेअर ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जन असं लिहिलं होतं. डॉक्टरांनी ही चुकीची माहिती प्रसिद्ध केली होती.
हे ही वाचा >> Govt Job: थेट NIA मध्ये नोकरीची संधी, पगार ऐकून थक्कच व्हाल!
पोलिसांकडून डॉ. अनुष्का यांचा शोध सुरु
पोलिसांनी डॉ. अनुष्का यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनुष्का फरार असून तिचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी तिचा शोध अनेक जिल्ह्यांमध्ये घेतला. कानपूरच्या सीएमओने त्यांच्या पदवीबाबत खुलासा करण्याचा रिपोर्ट मागितला आहे. डॉ. अनुष्काने तिच्या वकीलामार्फत एक जबाब नोंदवला आहे. पण पोलिसांनी तो मान्य केला नाही. दोन अन्य रुग्णांनीही डॉ. अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका रुग्णावर लखनऊमध्ये उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
