बीड : अंबाजोगाईत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चाकाखाली चिरडलं, भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा अंत

Beed Accident : बीडच्या अंबाजोगाई शहरात एक भीषण अपघात झाला. एका भरधाव येणाऱ्या ट्रकने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चाकाखाली चिरडलं, या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे.

Beed accident

Beed accident

मुंबई तक

08 Apr 2026 (अपडेटेड: 08 Apr 2026, 04:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भरधाव ट्रकनं बँक अधिकाऱ्याला चाकाखाली चिरडलं

point

दुर्दैवी अपघातात बँक अधिकाऱ्याचा मृत्यू

Beed Accident : रोहिदास हातागळे - बीडच्या अंबाजोगाई शहरात एक भीषण अपघात झाला. एका भरधाव येणाऱ्या ट्रकने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चाकाखाली चिरडलं, या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मृताचे नाव सुदर्शन टाक (वय 45) असे होते. ते दीनदयाळ बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, भरधाव वेगाने आलेल्या ट्राकने सुदर्शन टाक यांना धडक दिली, असता या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...

भरधाव ट्रकच्या धडकेत बँक अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, सुदर्शन टाक हे आता नेहमीप्रमाणे सकाळी स्कूटीवरून कामासाठी बँकेत निघाले होते. पण, त्याचक्षणी रिंग रोडच्या मानवलोक कार्यालयाजवळ नको तेच होऊन बसलं, अनियंत्रित ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली होती. संबंधित धडक इतकी भीषण होती की, या धडकेत त्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच, अंबेजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) रुग्णालयात पाठवला. दरम्यान, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरु करण्यात आला. 

हे ही वाचा : बीड : पोलीस दलात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यानं मध्यरात्री संपवलं जीवन, घटनेनं परिसर हादरला

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्नी तसेच इतर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. या घटनेनं परिसरात गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. सुदर्शन टाक यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.