बीड : पोलीस दलात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यानं मध्यरात्री संपवलं जीवन, घटनेनं परिसर हादरला

मुंबई तक

Beed News : बीड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाणे परिसरात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय (वय 42) हे पोलीस दलात सक्रिय होते, त्यांनीच आता राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं, यामागील नेमकं कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
google news

बातम्या हायलाइट

point

पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांच्या आत्महत्येचं कारण..

point

बीड शहर हादरले

Beed News : रोहिदास हातागळे - बीड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाणे परिसरात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय (वय 42) हे पोलीस दलात सक्रिय होते, त्यांनीच आता राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. हा धक्कादायक प्रकार नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशा नगर परिसरात घडला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. 

हे ही वाचा : 'मला त्याचं हृदय बाहेर काढायचं होतं..' लहानपणी आई-वडिलांना मारहाण होताना पाहिलं, 20 वर्षांनी उगवला भयानक सूड

पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांच्या आत्महत्येचं कारण..

पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार, यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, नवीन मोंढा भागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी ते पुण्याकडे गेले होते. संबंधित प्रकरणाचे काम करून ते रात्री घरी परतले होते. मात्र, रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती आहे. 

हे ही वाचा : पुणे : बाळाच्या सततच्या रडण्याला वैतागली, आईने 11 महिन्यांच्या बाळाला मारुन टाकले विहिरीत

त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा तसेच गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले होते, यामुळे बीडमध्ये त्यांची ओळख होती. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. संबंधित प्रकरणात आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती दिली. 

हे वाचलं का?