माहेरहून गाय आण, स्कुटीसाठी पैसे आण म्हणत सासरच्यांनी छळलं, सुनेनं विहिरीत उडी मारून...

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 11 Jun 2025, 10:20 AM)

सविताच्या नणंदेला अहमदनगरमध्ये घर घेण्यासाठी सविताच्या वडिलांकडे पैशाची मागणी करण्यात आली. सविताचे वडील काशिनाथ फसले यांनी आर्थिक अडचणींमुळे देता येणार नाही असं सांगितलं होतं.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडच्या आष्टीमध्ये सुनेनं स्वत:ला संपवलं

point

सासरच्यांकडून वारंवार छळ होत असल्याचा वडिलांचा आरोप

बीड : सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून सविता भाऊसाहेब विधाटे (वय 35)या महिलेनं स्वत:ला संपवलं. या विवाहितेनं घरासमोरच्याच विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाटमध्ये घडली. या प्रकरणी सविताचा पती भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासू लिलाबाई विधाटे यांच्याविरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

माहेरहून गाय आण, स्कूटीसाठी पैसे आण..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही काळ सविताला सासरी चांगली वागणूक मिळाली, परंतु नंतर तिचा छळ सुरू झाला. 

हे ही वाचा >> घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली, सुनेनं स्वत:ला संपवलं; आई-वडील म्हणाले सासू सासऱ्यांनी...

सासरच्या मंडळींनी मुलांना दूध पिण्यासाठी सविताच्या माहेरहून गाय आणण्याची मागणी केली. यानंतर स्कूटीसाठी पैसे मागितले गेले. तसंच, सविताच्या नणंदेला अहमदनगरमध्ये घर घेण्यासाठी सविताच्या वडिलांकडे पैशाची मागणी करण्यात आली. सविताचे वडील काशिनाथ फसले यांनी आर्थिक अडचणींमुळे देता येणार नाही असं सांगितलं.

घर विकायला केला होता विरोध

दरम्यान, विधाटे कुटुंबीयांनी स्वतःचे अहमदनगर येथील घर विकण्याची तयारी सुरू केली होती. याला सविताने विरोध केल्यानं तिचा छळ वाढला. या सततच्या त्रासाला कंटाळून सविताने घरासमोरील विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. सविताचे वडील काशिनाथ फसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा >> घरासमोर वाळू टाकल्यानं वाद, डोक्यात वीट घातली, तरूणाचा अंत... जालन्यात हादरवून टाकणारी घटना

अंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सविताच्या आत्महत्येमागील नेमकं कारण आणि सासरच्या छळाबद्दल चौकशी करत आहेत.