बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 09 Jun 2026, 01:16 AM)

Beed crime : बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या अंबाजोगाईत शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नराधम इथवर न थांबता त्याने पीडितेकडून 3 लाख रुपयांसह साडेनऊ तोळे सोने उकळले.

Beed crime

Beed crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

गुंगीचे औषध देऊन पीडितेवर लॉजवर अत्याचार

Beed Crime : रोहिदास हातागळे - बीडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीडच्या अंबाजोगाईत शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नराधम इथवर न थांबता त्याने पीडितेकडून 3 लाख रुपयांसह साडेनऊ तोळे सोने उकळले. संबंधित प्रकार हा शनिवारी उघडकीस आला. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  बॉयफ्रेंडनं 17 वर्षीय मुलीवर 60 वेळा कुऱ्हाडीने केला हल्ला, नंतर छतावरून फेकलं, पुढं...

नेमकं प्रकरण काय? 

केज तालुक्यातील तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी राहत होती. तेव्हा तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड नावाच्या दोन तरूणांशी झाली. नंतर दोन तरुण सतत तिचा पाठलाग करायचे. त्यापैकी महेश करपेनं तिला एकदा जबरदस्तीने मंचुरियन खायला घातले होते. मंचुरियन खाऊ घातल्याने पीडितेला गुंगी आली, याचाच फायदा घेत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. 

हे ही वाचा :  वर्धा : नवऱ्यानेच बायकोचे अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना पाठवले, एवढ्यावरच न थांबत..

गुंगीचे औषध देऊन पीडितेवर लॉजवर अत्याचार

पवन कराड नावाच्या तरुणाने देखील गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लॉजवर अत्याचार केला. नराधम एवढ्यावर न थांबता त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ लोकांना दाखवतो अशी धमकी देखील दिली. नंतर ब्लॅकमेल करत तिचे वारंवार शारीरिक शोषण केले. पोलीस ठाण्यात दिलेल्या कबुलीत सर्व नमूद करण्यात आले होते. दरम्यान, पोलीस या सर्व प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.