बॉयफ्रेंडनं 17 वर्षीय मुलीवर 60 वेळा कुऱ्हाडीने केला हल्ला, नंतर छतावरून फेकलं, पुढं...

मुंबई तक

Crime News : विकृत प्रियकराने आपल्याच 17 वर्षीय गर्लफ्रेंडवर कुऱ्हाडीने 60 वेळा हल्ला केला. पीडित मुलगी सैरावैरा धावू लागली होती. ती बचावासाठी छतावर पोहोचली असता, आरोपी प्रियकराने तिच्या गळ्याला दोरीचा फास लावला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेचा लग्नाला नकार 

point

तिला 12 फूटावरून फेकलं

Crime News : मध्य प्रदेशातील शिवपुरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विकृत प्रियकराने आपल्याच 17 वर्षीय गर्लफ्रेंडवर कुऱ्हाडीने 60 वेळा हल्ला केला. पीडित मुलगी सैरावैरा धावू लागली होती. ती बचावासाठी छतावर पोहोचली असता, आरोपी प्रियकराने तिच्या गळ्याला दोरीचा फास लावला आणि तिला छताला लटकवले आणि नंतर तिला तिथूनच खाली फेकून दिले.  

हे ही वाचा : वर्धा : नवऱ्यानेच बायकोचे अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना पाठवले, एवढ्यावरच न थांबत..

पीडितेचा लग्नाला नकार 

हा धक्कादायक प्रकार खोडा चौकी परिसरातील चंदावली परिसरातील गावात घडली.  पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी धर्मेंद्र परिहार (वय 22) हा बऱ्याच काळापासून मुलीचा छळ करत होता. या  आरोपीने तिला लग्नाची मागणी केली हेती, मात्र नंतर तिने लग्नाला नकार दिला.

 पीडितेवर कुऱ्हाडीने हल्ला अन् अल्पवयीन मुलीचा दोरीने गळा आवळला

घडलेल्या घटनेनुसार, पीडित मुलगी ही घरात एकटीच राहत होती. तिचे कुटुंबीय शेतात गेले होते. त्याचदरम्यान, आरोपी धर्मेंद्र परिहार घरात घुसला आणि त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर पीडित मुलगी आपला जीव वाचवण्यासाठी छतावर गेले, तेव्हा धर्मेंद्र तिच्या मागोमाग गेला. त्याने त्या अल्पवयीन मुलीचा दोरीने गळा आवळला आणि तिला अनेकदा जमिनीवर आपटले. 

तिला 12 फूटावरून फेकलं

तिला तीन मिनिटे छताला लटकवून ठेवले, तिचा मृत्यू झाला असल्याचं समजताच, त्याने तिला सुमारे 12 फूटावरून फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. घडलेल्या घटनेनुसार, मुलीच्या डोक्याला आणि मानेला जबर मार लागला होता. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हे वाचलं का?