भंडारा : भाचाला लग्नात आशीर्वाद दिले अन् परतताना व्हॅनचा चक्काचूर, भीषण अपघातात मामा-मामीसह 5 जणांचा करुण अंत

लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Bhandara Accident

Bhandara Accident

मुंबई तक

24 Apr 2026 (अपडेटेड: 24 Apr 2026, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भंडारा : भाचाला लग्नात आशीर्वाद दिले अन् परतताना करुण अंत

point

भीषण अपघातात मामा-मामीसह 5 जणांचा मृत्यू

Bhandara Accident, व्येंकटेश दुडमवार : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावानजीक गुरुवारी मध्यरात्री एका भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

व्हॅनचा चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील सुदर्शन नान्हे यांचा विवाह सोहळा गुरुवारी पार पडला होता. लग्नकार्यावरून वऱ्हाडी मंडळी व्हॅनने घरी परतत असताना अड्याळपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर समोरून येणाऱ्या एका ट्रकने वॅनला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि प्रवासी आतमध्ये अडकून पडले.

हे ही वाचा : गिरीश महाजनांना धारेवर धरणाऱ्या ‘त्या’ महिलेच्या अडचणी वाढल्या, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेत नवरदेवाचे मामा-मामी आणि एकाच कुटुंबातील माय-लेकींसह एकूण पाच जणांचा अंत झाला. मृतांमध्ये श्वेता पुरुषोत्तम नगरे (16), दुर्गा देवराम नगरे (42), नयना देवराम नगरे (18), प्रभाकर चाचरकर (48) आणि मुन्नी प्रभाकर चाचरकर (43) यांचा समावेश आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 जणांवर सध्या भंडारा जिल्हा रुग्णालय आणि अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक: केशव उपाध्येंना लागणार आमदारकीची लॉटरी?, महाराष्ट्रातून भाजप हायकमांडकडे पाठवली 'ही' नावं

मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हॅनमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा वापर करावा लागला. या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका क्षणात पाच जणांचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.