मुंबईची खबर : उल्हासनगरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार, कॅबिनेटकडून निधी मंजूर, कसा आहे प्लॅन?

नुकत्याच (22 एप्रिल) झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांची गर्दीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

Metro 5 A News

Metro 5 A News

मुंबई तक

• 04:13 PM • 23 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : उल्हासनगरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार

point

कॅबिनेटकडून निधी मंजूर

point

कसा आहे प्लॅन?

Metro 5 A News : गर्दीतून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच (22 एप्रिल) झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार आहे. या बैठकीत उल्हासनगरपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल. हा निर्णय नेमका काय आहे आणि मेट्रो कधी सुरु होणार आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

18 हजार कोटींहून अधिक निधी

नुकत्याच झालेल्या मंत्रीमडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे उल्हासनगरपर्यंत मेट्रोचा विस्तार. मुंबई मेट्रो मार्गिका 5 अ च्या दोन टप्प्यांसाठी एकूण 18,130.55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 34.21 किमी लांबीची ही मार्गिका असून यामध्ये 19 स्थानकांचा समावेश आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्र : पैसा, प्लॉट अन् घर गेलं, आईची आत्महत्या, शहीदपुत्राची कहाणी, नोकरीसाठी 2 कोटींची फसवणूक

69 लाख प्रवाशांना फायदा

यामधील टप्पा 1 हा कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा 2 हा धामणकर नाका ते दुर्गाडी पर्यंत असणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे 69 लाख लोकांना फायदा होणार आहे.

हे ही वाचा : "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", संजय गायकवाडांकडून शिवीगाळ अन् मारहाणीची भाषा

वेळेत 50 टक्के बचत

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवास वेळेत 40-50% बचत होईल. सध्या मेट्रो 5 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.