अंबरनाथ हादरलं, तरुणीवर मनी लॉन्ड्रिंगसाठी दबाव टाकल्याचा आरोप, अखेर पीडितेनं संपवलं जीवन

Ambernath crime : अंबरनाथ येथे सिमरन पाटील नावाच्या एका तरुणीने जीवन संपवलं. तरुण भगवान लोटे हा सिमरनला अवैध कामांमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होता, .याच त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याची माहिती आहे. या प्रकरणी भगवान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Ambernath crime

Ambernath crime

मिथिलेश गुप्ता

22 Apr 2026 (अपडेटेड: 22 Apr 2026, 09:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बयफ्रेंडने पीडितेला मनी लाँड्रिंगसाठी आणला दबाव

point

पीडितेला फोन कॉल्स, चॅट्सद्वारे अनेकदा मानसिक दबाव आणला

Ambernath Crime : अंबरनाथ येथे सिमरन पाटील नावाच्या एका तरुणीने जीवन संपवलं. तरुण भगवान लोटे हा सिमरनला अवैध कामांमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत होता, .याच त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याची माहिती आहे. या प्रकरणी भगवान विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी  माहिती तपासातून समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Mumbai-Pune Highway दोन दिवस 'एवढे' तास राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

बयफ्रेंडने पीडितेला मनी लाँड्रिंगसाठी आणला दबाव

सिमरन पाटील ही भगवान लोटे यांच्या कंपनीत अकाउटंट म्हणून कार्यरत होती, त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध झाले होते. लोटेने आपल्या पदाचा फायदा घेत पीडितेशी गैरवर्तन केलं. त्याने तिच्याकडून अनेकदा मनी लाँड्रिंगची कामे करून घेतली होती. पीडितेला हे काम सोडायचे होते, तिने वारंवार काम सोडण्याबाबत माहिती दिली, मात्र लोटेनं पीडितेवर अनेकदा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली होती. 

पीडितेला फोन कॉल्स, चॅट्सद्वारे अनेकदा मानसिक दबाव आणला

10 एप्रिल रोजी पीडितेला S3 पार्क हॉटेलमधील खोली क्रमांक 310 मध्ये बोलावण्यात आले. अनेकदा फोन कॉल्स, चॅटिंगद्वारे तिच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला होता. संबंधित प्रकरणात आरोपीचा शोध घ्यायचा असून, पोलीस लवकरच त्याला अटक करतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली. 

हे ही वाचा : पत्नी Video कॉलवर बोलत होती, नवऱ्याने पकडलं... मुलाला म्हणाला 'जा TV बघ', अन्...

दरम्यान सध्या आरोपी हा फरार असून त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासाच्या माहितीनुसार, भगवान लोटे विरोधात गुन्हा दखल केला आहे.