Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, 24 जिल्ह्यांचं खरं नाही, महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 21 Apr 2026

maharashtra weather : राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला, जाणून घेऊयात 21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात लक्षणीय बदल

point

तब्बल 24 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट

point

 21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होताना दिसतोय. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 24 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला, जाणून घेऊयात 21 एप्रिल 2026 रोजी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध, नवऱ्याला सहन झालं नाही, तरुणावर चाकूने सपासप केले वार अन्... भयंकर कांड

कोकण 

कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जारी केला. तसेच किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग वाढू अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता असून काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची अधिक शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांत दुपारनंतर वातावरणात बदल जाणवेल. या भागातील तापमानात घट निर्माण होऊन उष्णतेची तीव्रता कमी होईल, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. तसेच काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक वाढण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली,परभणी, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. वि‍जांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे ही वाचा : पुणे : सिक्युरिटी गार्डचा अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर समोर आलं प्रकरण

विदर्भ 

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला. वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट आहे, उष्माघाताचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.