चंद्रपूर : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होऊ लागला, अन् ह्रदयविकाराचा झटका आला, 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील देलनवाडी येथे शाळेची तयारी करत असताना 10 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Chandrapur News

Chandrapur News

मुंबई तक

21 Apr 2026 (अपडेटेड: 21 Apr 2026, 05:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूर : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होऊ लागला

point

अन् ह्रदयविकाराचा झटका आला, 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथून मनाला चटका लावणारी एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ईशान सत्यपाल आत्राम असे या मृत मुलाचे नाव असून, तो ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. रोजच्याप्रमाणे आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी सज्ज होणाऱ्या या चिमुरड्याचा असा अचानक अंत झाल्याने केवळ देलनवाडीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लहान वयातच काळाने झडप घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

आनंदाने शाळेसाठी तयार होत असतानाच कोसळला काळ

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा आज सकाळी नेहमीप्रमाणे उत्साहाने शाळेत जाण्यासाठी उठला होता. त्याने आपली आंघोळ आटोपली आणि तो शाळेचा गणवेश परिधान करून पूर्णपणे तयार होत होता. मात्र, सकाळी 7 वाजेच्या सुमारास नियतीला काही वेगळेच मान्य होते. गणवेश घालत असतानाच अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जागीच कोसळला. आपल्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बेशुद्ध पडलेल्या ईशानला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कमी वयातील हृदयविकाराने सर्वच अवाक; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

ईशानचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट होताच आत्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. ज्या मुलाला काही वेळापूर्वी शाळेसाठी तयार होताना पाहिले, त्याचा मृतदेह पाहण्याची वेळ आल्याने आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अवघ्या 10 वर्षांच्या मुलाला इतक्या तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका कसा येऊ शकतो, या विचाराने वैद्यकीय क्षेत्र आणि नागरिक अवाक झाले आहेत. या घटनेमुळे शाळेतील त्याचे शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींमध्येही शोकाकुल वातावरण असून, एका अभ्यासू आणि खेळकर विद्यार्थ्याला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेजाऱ्याने चिमुकलीसमोर तिच्या आई-बापाला संपवलं, गळा चिरुन क्रूरपणे हत्या; नेमकं कारण काय?