मुंबईची खबर : बेस्टने घेतला महत्त्वाचा निर्णय, तिकीट काढण्यासाठी 'ही' नवी सुविधा सुरु

बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता बेस्टचे तिकिट खरेदी करण्यासाठी नव्या डिजिटल सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 01:17 PM • 22 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : बेस्टने घेतला महत्त्वाचा निर्णय

point

तिकीट काढण्यासाठी 'ही' नवी सुविधा सुरु

Mumbai News : बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरासांठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बेस्टने तिकिटाची सेवा आता ONDC या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे आता फोन पे, गुगल पे आणि पे-टीएम सारख्या अॅप्सच्या माध्यमातून तिकिटे काढता येणार आहेत. त्यासाठी आता मोबाईलवरुन तिकिट काढण्यासाठी बेस्टच्या अॅपवर अवलंबून रहावे लागणार नाही.

हे वाचलं का?

मोठ्या प्रमाणात प्रवाशांपर्यंत पोहोचणार

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यामुळे मुंबईतील प्रवास अधिक सुलभ आणि मल्टिमोडल होण्यास मदत होईल. या नव्या सुविधेमुळे बेस्टला आता मोठ्या प्रमाणात प्रवाशांपर्यंत पोहोचता येणार आहे. यामध्ये  उबर, रॅपिडो आणि व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्मचाही समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून डिजिटल आधारित व्यवहारांद्वारे तिकीट घेता येईल. प्रवाशांना विविध प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक सेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा : मातोश्रीवर विधानपरिषदेच्या एकमेव जागेसाठी 4 नेत्यांचं लॉबिंग, पण काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर ठेवली 'ती' अट

रोख व्यवहारांचा ताण कमी होणार

या निर्णयामुळे डिजिटल तिकीट प्रणालीच्या वापरात मोठी वाढ होईल, असा अंदाजही 'बेस्ट' प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या बेस्टच्या एकूण प्रवाशांपैकी केवळ 15 ते 16 टक्के प्रवासी डिजिटल पद्धतीचा वापर करतात. मात्र, ओएनडीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य ॲप्सवर तिकीट उपलब्ध झाल्यामुळे हे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या बदलामुळे बसमधील रोख व्यवहारांचा ताण कमी होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचेल.

हे ही वाचा : सुषमा अंधारेंची विधानपरिषदेसाठी रश्मी ठाकरेंकडे फिल्डिंग? मातोश्रीवर इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला मिळणार संधी?

विनासायास प्रवास करणे शक्य

यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बस या तिन्ही वाहतूक व्यवस्था एकाच डिजिटल प्लॅटॉर्मवर येतील. 'ओएनडीसी'चे नेटवर्क सध्या देशातील 26 शहरांमध्ये विविध वाहतूक पर्यायांसह कार्यान्वित आहे. आता मुंबईतील 'बेस्ट' या नेटवर्कमध्ये सामील झाल्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक मजबूत होईल आणि प्रवाशांना विनासायास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे शक्य होईल.