मुंबईची खबर : लवकरच सुरु होणार भुयारी लोकल, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फक्त लोकलमधील गर्दी कमी होणार नाहीये तर मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Mumbai News

Mumbai News

मुंबई तक

• 12:38 PM • 19 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

लवकरच सुरु होणार भुयारी लोकल

point

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

point

काय आहे प्लॅन?

Mumbai News : मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फक्त लोकलमधील गर्दी कमी होणार नाहीये तर मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रशासनाचा निर्णय नेमका काय आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

भुयारी रेल्वेसाठी हालचाली

उपनगरीय रेल्वे सेवा आता प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. रेल्वे प्रशासनाने भुयारी रेल्वे मार्ग सुरु करण्याच्या विचारात आहे. चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गांवर भुयारी रेल्वे सुरु करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रकल्प जर मार्गी लागला तर लोकल सेवेवरचा फार मोठा बोजा कमी होण्यास मदत होईल.

हे ही वाचा : अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' वस्तू, कुटुंबाची होईल भरभराट, कधीच कमी पडणार नाही पैसा..

सुरक्षित प्रवासासाठी..

सद्यस्थितीत लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सीएसएमटी ते कर्जत-कसाऱ्यापर्यंत दररोज 38 लाख प्रवासी प्रवास करतात; तर चर्चगेट ते हडाणू या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करतात. या गर्दीमुळे दररोज जीवघेणे अपघात घडत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेला भुयारी रेल्वे मार्गाचा निर्णय फायदेशीर ठरु शकतो. यामुळे प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवेश करता येईल आणि सुरक्षितरीत्या बाहेरही पडता येईल.

हे ही वाचा : Govt Jobs : डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी, 668 जागांची होणार भरती; लगेच करा अर्ज

तांत्रिक व आर्थिक घटकांचा अभ्यास

मुंबईत नवे प्रकल्प सुरु करायचे असतील तर येणारी मुख्य अडचण म्हणजे जागा. अतिक्रमणे, लोकांचे पुनर्वसन, झाडे यामुळे नवीन प्रकल्पांमध्ये बाधा येते. मात्र भुयारी रेल्वे प्रकल्पामुळे जागेची फारशी अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. सध्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या भुयारी रेल्वेच्या तांत्रिक व आर्थिक घटकांचा अभ्यास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सुरु केलेला आहे.