Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा धिंगाण, 19 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले, अशातच जाणून घेऊयात 20 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 20 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामानात पुन्हा बदल

point

राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात हवामानात पुन्हा बदल झालेला दिसून येत आहे. राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले, अशातच जाणून घेऊयात 20 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं, पोटदुखीचा त्रास अन् तपासणीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली, सुरक्षारक्षकावर बलात्काराचा आरोप

कोकण 

कोकण विभागात रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज जारी केला. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोल्हापूर घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि नाशिक या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला.  तसेच जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट कोसळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. या विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचं सावट आहे. 

हे ही वाचा : यवतमाळ जिल्ह्याच्या 'या' तालुक्यात सहा महिन्यांपासून 34 आदिवासी मुली बेपत्ता?, डोकं चक्रवणारं प्रकरण

विदर्भ 

विदर्भातली चंद्रपूर, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला. मात्र, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहील असा हवामानाचा अंदाज आहे. दुपारी घराबाहेर पडताना उन्हापासून काळजी घ्यावी अशी शक्यता वर्तवलेली आहे.