पुणे हादरलं, पोटदुखीचा त्रास अन् तपासणीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली, सुरक्षारक्षकावर बलात्काराचा आरोप
Pune crime : पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोटदुखीची तक्रार घेऊन एक अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी आली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचा माहिती समोर आली. या धक्कादायक खुलाशाने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी
मुलगी पाच महिन्यांची राहिली गर्भवती
Pune Crime : आदित्य भावार - पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोटदुखीची तक्रार घेऊन एक अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी आली असता, ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली. या धक्कादायक खुलाशाने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. ज्या इमारतीत पीडित अल्पवयीन मुलगी राहते, त्याच इमारतीतील सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पीडितेनं आरोप केला. संबंधित प्रकरणातील आरोपीची ओळख शैलेश कुमार (वय 25) अशी पटली आहे, अशातच शैलेश कुमार फरार असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : तरुणीसोबत वृद्ध नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ, काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपली
पीडितेवर सुरक्षा रक्षकाकडून लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी
पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, असे निष्पन्न झाले की, आरोपी हा संबंधित गृहनिर्माण संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता आणि तो इमारतीच्या तळमळल्याच्या एका खोलीत राहत होता. त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
मुलगी पाच महिन्यांची राहिली गर्भवती
काही दिवसांपूर्वी, जेव्हा पीडित मुलगी आजारी पडली तेव्हा तिच्या आईने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय तपासणी केली असता, डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा दुजोरा मिळाला. रुग्णालयाच्या प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
हे ही वाचा : कल्याण : कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
संबंधित प्रकरणात पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस कारवाई करणार असल्याचा आरोपीला संशय येताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला.









