धाराशिव : ... तू माजलास का?', वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पुतण्याला काकाने संपवलं, जमिनीचा वाद वाईट

मुंबई तक

20 Apr 2026 (अपडेटेड: 20 Apr 2026, 03:07 PM)

Dharashiv crime : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याची हत्या केली. काकाने पुतण्यावर चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. मृत तरुणाचे नाव सुजित ज्ञानेश्वर शेळके असे असून तरुण कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. 

Dharashiv crime

Dharashiv crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याची हत्या केली

point

'तुला जमीन देणार नाही', तू जास्त माजलास का?' हल्ला करत खून

Dharashiv crime :  गणेश जाधव - धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याची हत्या केली. काकाने पुतण्यावर चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे संपवलं. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. मृत तरुणाचे नाव सुजित ज्ञानेश्वर शेळके असे असून तरुण कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : MMS व्हिडिओचा पूर, ऑफिस ते बेडरुमपर्यंतची सारी गुपितं उलगडली; कोण आणतं व्हिडिओ बाहेर?

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी विलास शिवाजी शेळके हा आपल्या आई-वडिलांशी जमिनिच्या वादातून तो सतत वाद घालायचा आणि नंतर मारहाण करायचा. याघटनेदरम्यान पुतण्या सुजितने मारहाण करताना मध्यस्ती केली तिच त्याची मोठी चूक झाली. 

'तुला जमीन देणार नाही', तू जास्त माजलास का?' हल्ला करत खून

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सुजितने संतापाच्या भरात 'तुला जमीन देणार नाही', तू जास्त माजलास का?' असं सुनावल्यानं, त्याच्यावर हल्ला करत त्याचा खून केला. या प्रकरणी मृताची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिरढोण पोलीस ठाणे परिसरात आरोपी विलास शेळके विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : सख्ख्या भाचीला आपल्या खोलीत घेऊन गेला अन्... असा मामा कोणालाही न मिळो!

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित प्रकरणाचा अधिकचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर आणि पोलीस उपनिरीक्षक चोपणे करत आहेत.