Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. उष्ण आणि पावसाचा दुहेरी परिणाम जाणवत आहे. राज्यात एकूण जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत हवामान विभागाने कसलाही अलर्ट जारी केला नसला, तरीही त्या भागांत हलका-मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला. अशातच 23 एप्रिल 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अंबरनाथ हादरलं, तरुणीवर मनी लॉन्ड्रिंगसाठी दबाव टाकल्याचा आरोप, अखेर पीडितेनं संपवलं जीवन
कोकण
कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशातच दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवण्याची संभावना आहे. तसेच या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज जारी केला. याच विभागातील जिल्ह्यांमध्ये दुपारी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. यामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाला यलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी पावसाची अधिक शक्यता वर्तवलेली आहे. नागरिकांनी पावसापासून सावध राहावं, असा सतर्कतेचा इशारा दिला.
हे ही वाचा : सुषमा अंधारेंची विधानपरिषदेसाठी रश्मी ठाकरेंकडे फिल्डिंग? मातोश्रीवर इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला मिळणार संधी?
विदर्भ
विदर्भ विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेत वाढ होताना दिसतेय. तसेच राज्यात दुहेरी संकट पाहायला मिळेल.
ADVERTISEMENT











