'...नाहीतर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव' सावकारची 'ती' मागणी ठरली शेवटची, कारण...

नागपूरमध्ये एका सावकाराची हत्या करण्यात आली आहे. एका पुलाखाली पोत्यात त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीस तपासात हत्येच्या मागे असलेल्या एका भयानक कारणाचा उलगडा झाला आहे.

Nagpur Crime

Nagpur Crime

योगेश पांडे

24 Apr 2026 (अपडेटेड: 24 Apr 2026, 03:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : व्याज दे नाहीतर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..

point

सावकाराची मागणी ऐकून डोक्यात तिडीक

Nagpur Crime : नागपूरात एका पुलाखाली पोत्यात मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. राहुल साहू असे मृत व्यक्तीचे नाव असून तो नागपूरातील झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासानुसार, मृताने आरोपीला काही पैसे व्याजाने दिले होते. मात्र मुद्दल आणि व्याजाची परतफेड केल्यानंतरही मृत व्यक्ती आरोपीकडे 35 हजार रुपयांची मागणी करत होता. पैसे देऊ न शकल्यास तो आरोपीच्या मुलीसोबत शारीरिक संबंधाची मागणी करत होता. यामुळे संतापून आरोपीने लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली.

हे वाचलं का?

हत्या करुन मृतदेह पुलाखाली टाकला

इतकेच नाही तर हत्येनंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून नारा घाटजवळ वाहणाऱ्या पिवळी नदीच्या पुलाखाली फेकून दिला. जेव्हा लोकांनी पोलिसांना मृतदेहाची माहिती दिली, तेव्हा पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला. तपासात मृताची ओळख झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी राहुल सुनील साहू म्हणून झाली. राहुल सदर येथील अचरज टॉवरमध्ये 'हॅप्पी डे' नावाचे हॉटेल चालवत असे.

हे ही वाचा : अकोला : पोलीस निरीक्षक असलेला पती दुसऱ्या महिलेसोबत असल्याची खबर, पत्नी तिथे पोहोचताच तुफान राडा

शारीरिक संबंधाची मागणी

पोलिसांसाठी राहुलचे कॉल डिटेल्स हा सर्वात मोठा पुरावा ठरला. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 40 वर्षीय ई-रिक्षा चालक नवीन पंजाबराव पुंडकर याने जो खुलासा केला तो धक्कादायक होता. नवीनने कोरोना काळात राहुलकडून व्याजाने पैसे घेतले होते, दुप्पट पैसे परत करूनही राहुल आणखी 35 हजार रुपयांची मागणी करत होता. घटनेच्या दिवशी जेव्हा राहुल पैसे घेण्यासाठी नवीनच्या घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्यात वाद वाढला. पैसे न दिल्यास तो मुलीसोबत शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. यामुळे संतापलेल्या नवीनने जवळच असलेला लोखंडी रॉड उचलला आणि राहुलच्या डोक्यावर सपासप वार करून त्याला संपवून टाकले.

हे ही वाचा : सातारा : आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; 700 फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्यात पावसाचा अडथळा

स्वत:च्याच ई-रिक्षातून फेकला मृतदेह

हत्येनंतर नवीनने अत्यंत शिताफीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याने रक्ताने माखलेला मृतदेह पोत्यात भरला आणि स्वतःच्याच ई-रिक्षात लादून मध्यरात्री नारा घाट पुलाखाली फेकून दिला. जरीपटका पोलिसांनी आरोपी नवीनला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.