Railway Recruitment: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; अप्लाय करण्याची शेवटची तारीख कोणती? कसं आणि कुठे कराल अप्लाय?

साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR), आरआरसी नागपुर विभागाने अप्रेंटिसच्या मोठ्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साइटवर जाऊन यासंबंधिची माहिती तपासू शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; कसं आणि कुठे कराल अप्लाय?

रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; कसं आणि कुठे कराल अप्लाय?

मुंबई तक

• 03:41 PM • 01 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वेमधील 'या' पदांसाठी मोठी भरती

point

रेल्वेमध्ये करिअरचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट

point

साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR) अप्रेंटिस भरती

Railway Vacancy: रेल्वे भरतीच्या परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या तरुणांसाठी सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या मुलांना रेल्वे मध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते. साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR), आरआरसी नागपुर विभागाने अप्रेंटिसच्या मोठ्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साइटवर जाऊन यासंबंधिची माहिती तपासू शकतात. 

हे वाचलं का?

भरतीसाठी इच्छुक करणाऱ्या उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करावं लागणार आहे.  यासाठी पात्र विद्यार्थी 4 मे 2025 तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकतात. त्यामुळे याकडे पात्र परीक्षार्थींनी लवकरच साइटवर जाऊन अप्लाय करणं गरजेचं आहे. अंतिम तारीख निघून गेल्यानंतर उमेदवारांना अप्लाय करण्याची संधी मिळणार नाही. 

'या' पदासाठी रिक्त जागा

या भरतीअंतर्गत, SECR ने एकूण 1007 पदांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. यापैकी 919 पदे नागपूर विभागासाठी राखीव आहेत आणि 88 पदे वर्कशॉप मोतीबागसाठी राखीव आहेत.

हे ही वाचा: CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी,  कोण ठरलंय सरस?

काय आहे पात्रता?

शिक्षण: या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण (किमान 50 टक्के) असलेला विद्यार्थी पात्र आहे. तसेच, यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. 

वयोमर्यादा: जाहीर झालेल्या सूचनेनुसार, 15 वर्षे ते 24 वर्षे वयोगटातील विद्यार्थी या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज करणाऱ्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत मिळेल. 
अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना 5 वर्षे, OBC धारकांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाणार आहे. 

अर्ज करण्यासाठी लागणार इतके शुल्क

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. जनरल/ OBC/ EWS प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, SC/ ST/ PWD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.  

हे ही वाचा: ATM पासून ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत... 1 मे पासून मोठे बदल, तुमच्या खिशावरचा ताण वाढणार?

    follow whatsapp