सावित्री नदीवरील पुलासारखी भयंकर घटना, गुजरातमध्ये पूल कोसळला अन् गाड्या गेल्या वाहून 'एवढ्या' लोकांचा मृत्यू

Birdge collapes : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी 9 जुलै रोजी एक पूल कोसळला असल्याची माहिती आज तक या वृत्त माध्यमाने दिली आहे.

birdge collapes in gujrat

birdge collapes in gujrat

मुंबई तक

• 05:30 PM • 09 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातमधील वडोदरात पूल कोसळला

point

9 जणांनी आपला जीव गवमावला

Birdge collapes : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी 9 जुलै रोजी एक पूल कोसळला असल्याची माहिती आज तक या वृत्त माध्यमाने दिली आहे. या अपघातात तब्बल 9 जणांनी आपला जीव गवमावला आहे. यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पूल कोसळला तेव्हा पाच वाहने थेट नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं आता गुजरातमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "आई लवकरच जेवायला येतो", शेवटचा फोन अन् J. J. हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी..

पूल कोसळून वाहने नदीत

यापैकी एक पिकअप गाडी आणि एक ट्रक नदीत अडकले आहेत, तर एक टँकर पुलावरच दिसत आहे. पूल कोसळ्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य करण्यात सुरूवात केली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांदरम्यान पूल कोसळला असल्याची माहिती दिली आहे. 

9 जणांचा मृत्यू

दरम्यान, वडेदराचे जिल्हाधिकारी अनिक धामेलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला. तर यात 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरु आहे.

संबंधित प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, एका पिकअपने आणि एक ट्रक आणखी काही वाहने नदीत अडकलेली आहेत, ती वाहने काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, पूलाची अद्यापही तपासणी केली नाही. त्यामुळे या पूलाबाबतची माहिती लवकरच समोर येईल. 

हेही वाचा : विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

गेल्याच वर्षी या पुलाची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावरील वाहतुकीचा ताण सतत वाढत होता. याबाबत राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वी 212 कोटी खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मंजुरी दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. 

    follow whatsapp