70 वर्षीय भाजप नेत्याचा डान्सरसोबत अश्लील Video झाला Viral

BJP leader Viral Video : भाजप नेते बब्बन सिंग रघुवंशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या नेत्यानं डान्सरसोबत अश्लील डान्स केल्याचा आरोप होत आहे.

BJP Leader With Dancer Woman Video Viral

BJP Leader With Dancer Woman Video Viral

मुंबई तक

15 May 2025 (अपडेटेड: 15 May 2025, 04:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप नेत्याचा डान्सरसोबतचा व्हिडीओ का होतोय व्हायरल?

point

बब्बन सिंग रघुवंशी आहेत तरी कोण?

point

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं?

BJP leader Viral Video : भाजप नेते बब्बन सिंग रघुवंशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या नेत्यानं डान्सरसोबत अश्लील डान्स केल्याचा आरोप होत आहे. सिंग यांनी डान्सर तरुणीला किस करून तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. डान्सरसोबत अश्लील कृत्य करणारे भाजप नेते सिंग यांची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगलीय. 

हे वाचलं का?

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

भाजप नेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ 30 दिवसांपूर्वीचा जूना व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ बिहारचा असल्याचं बोललं जात आहे. भाजप नेत्यानं बिहारमध्ये एका लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. याच लग्नसोहळ्यात भाजप नेता आणि डान्सरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. भाजप नेत्यानं डान्सरसोबत चुकीचं कृत्य केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं. या नेत्यानं डान्सरला मांडीवर बसवून अश्लील चाळे केल्याचंही सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतं की, या नेत्याला कसलीच भीती नाहीय. या नेत्यानं बिंधास्तपणे डान्सरसोबत अश्लील कृत्य केलं.

हे ही वाचा >> लय भारी..सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण! तुमच्या शहरात आजचे भाव काय? किंमत वाचून खूश व्हाल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं?

भाजप नेते बब्बन सिंग रघुवंशींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सिंग यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. व्हिडीओबाबत बोलताना ते म्हणाले, ते बिहारला लग्नसोहळ्यात गेले होते. या लग्नसोहळ्यात बांसडीहचे भाजप आमदार केतकी सिंग यांचे पतीसुद्धा उपस्थित होते. भाजप नेत्याचा आरोप आहे की, केतकी सिंग यांच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री दया शंकर सिंग यांचा नातेवाईक असल्याने मला फसवलं जात आहे, असंही सिंग म्हणाले.

बब्बन सिंग रघुवंशी कोण आहेत?

भाजप नेते बब्बन सिंग रघुवंशी बलिया येथील द सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम करत असल्याचं ते सांगतात. सिंग यांनी असाही दावा केला आहे की, त्यांनी वर्ष 1993 मध्ये बांसडीह विधानसभेतून निवडणूकही लढवली होती. तसच भाजपकडून आगामी विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार असल्याचा दावाही सिंग यांनी केला आहे.

हे ही वाचा >> कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि कुकडेचं प्रकरण... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी

    follow whatsapp