Married Woman Extra Marital Affair Viral News : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात नात्य़ाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप आहे. याबाबत जेव्हा महिलेच्या पतीला कळलं, तेव्हा त्याने त्याच्या भावासोबत भयानक कृत्य केलं. ही धक्कादायक घटना बागपत जिल्ह्यात खेकडा परिसरात असलेल्या बसी गावात घडली. ही घटना पाच महिने जुनी आहे. हिमांशू नावाच्या युवकाने त्याच्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून मावस भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय फरार झाला होता. पण पोलिसांना आता त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशूवर आरोप होता की, तो अक्षय ड्युटीवर गेल्यानंतर हिमांशू त्याच्या घरी जायचा. यादरम्यान तो अक्षयच्या पत्नीसोबत संबंध करायचा, असा आरोप आहे. अक्षयला जेव्हा याबाबत माहित झालं, तेव्हा त्याने बदला घेण्यासाठी कट रचला.
हे ही वाचा >> मनोहरलाल धाकडसोबत नग्न अवस्थेत असणारी महिला कोण? सत्य आलं समोर
असा रचला हत्येचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सुट्टी मिळाल्यावर गावाला राहायला आला. त्याने हिमांशूला घरी बोलावण्यासाठी पत्नीला सांगितलं. हिमांशू जसा तिथे पोहोचला, अक्षयने त्याला गोळी मारली आणि नंतर त्याचा गळा चिरला. अक्षयने हिमांशूच्या मृतदेहाला हिंडन नदीत फेकलं. हिमांशू तीन दिवस घरी न आल्याने कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आणि 8 लोकांना ताब्यात घेतलं. पण त्याचदरम्यान अक्षय तिथून फरार झाला. पोलिसांनी अक्षयवर 25 हजाराचं बक्षिस ठेवलं होतं. अशातच पोलिसांनी पाच महिन्यानंतर अक्षयला अटक केली.
हे ही वाचा >> फूस लावून अल्पवयीन मुलीला नेलं अन् केला गँगरेप! नराधमाने मित्रांना बोलावून व्हिडीओ बनवला अन्...
पाच महिन्यानंतर केली अटक
या हत्या प्रकरणी एएसपी नरेंद्र प्रताप सिंग यांनी माहिती दिली की, खेकडा परिसरात झालेल्या हिमांशू हत्याप्रकरणाचा तपास लावला आहे. पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली आहे. आरोपीने पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून हिंमाशूची हत्या केली. पोलिसांना घटनास्थळी हिमांशूची चप्पल सापडली. जी या केसचा महत्त्वाचा पुरावा ठरला.
ADVERTISEMENT
