डिसेंबर महिन्यात सध्या पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. मात्र, यामध्येच अनेक दुर्घटनाही घडताना दिसत आहेत.
अशीच एक भयावह घटना मनालीला फिरण्यासाठी गेलेल्या 5 मित्रांसोबत घडली. लघवी करण्यासाठी वाटेत गाडी थांबवून खाली उतरणं जीवघेणं ठरलंय. कारण फिरायला जाणाऱ्या या मित्रांपैकी एक जण खाली उतरला असताना तो थेट पाय घसरून 400 मीटर दरीत कोसळला आहे.
ADVERTISEMENT
तरूण थेट 1000 फूट खोल दरीत कोसळल्यानंतर त्याचे मित्र अक्षरश: हादरले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर काही वेळातच तिथे एसडीआरएफ जवान दाखल झाले. पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी दरीत कोसळलेल्या व्यक्तिला शोधायला सुरूवात केली. मोठ्या प्रयत्नांनंतर या व्यक्तिला बाहेर काढण्यात यश आलं असून, सध्या या व्यक्तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा >>Mumbai Crime News : वासनांध प्रवाशनं थेट टॅक्सीमध्येच महिलेसमोर सुरू केलं... ग्रँट रोड परिसरातील चीड आणणारी घटना
चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील मंडी मंडी जिल्ह्यात ही घटना घडली. कारने मनालीला जाणारे हे पाच तरुण हरियाणाचे रहिवासी आहेत. हा अपघात 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कुमार, तेजवीर, अजय, मनजीत आणि नितेश कुमार हे पाच मित्र हरियाणातून मनालीला कारमधून जात होते.
मंडी जिल्ह्यातील पंडोह गावाजवळ या मित्रांनी आपली कार थांबवली आणि त्यातील एक जण लघवीसाठी कारमधून खाली उतरला. यादरम्यान मनजीत कुमार नावाच्या या तरूणाचा पाय घसरला आणि तो बियास नदीच्या पात्रात जवळपास हजार फूट खोल कोसळला.अपघातात मनजीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा >>आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रु. दंड, 'या' गावाचा नवा नियम!
अपघाताची माहिती मिळताच पंडोह चौकीचे पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. यानंतर जखमी तरुणाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरी खूप खोल असल्याने, आपत्ती व्यवस्थापन दलाच्या(एसडीआरएफ) जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. काही वेळ चाललेल्या बचावकार्यानंतर तरुणाला रस्त्यावर आणण्यात आले. तिथून जखमी तरुणाला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
