Govt Job: पदवीधरांसाठी खुशखबर! 'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती... कधीपर्यंत कराल अप्लाय?

कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

 'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती...

'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती...

मुंबई तक

• 01:30 PM • 27 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पदवीधर तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

point

'या' बँकेत तब्बल 3,500 पदांसाठी भरती...

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job: ग्रॅज्युएशनची डिग्री प्राप्त करून सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 23 सप्टेंबर पासूनच अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी canarabank.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 

हे वाचलं का?

या भरतीच्या माध्यमातून बँकेत अप्रेन्टिसशिपच्या एकूण 3500 पदांवर भरती केली जाणार आहे. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे अर्ज करण्याच्या प्रक्रियेच्या शेवटच्या तारखेआधीच उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

शैक्षणिक पात्रता

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, उमेदवारांनी  01/01/2022 ते 01/09/2025 या तारखांदरम्यान, पदवी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. 

वयोमर्यादा

तसेच, भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असणं गरजेचं आहे. यासोबतच, उमेदवाराचा जन्म 01/09/1997 च्या पूर्वी आणि 01/09/2005 च्या नंतर झालेला नसावा. याशिवाय,स सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

हे ही वाचा: मुंबईकरांनो सावधान! रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे दागिने लुटायचे, चोरीची 'अशी' ट्रिक अन्... ठाण्यातील दोघांना अटक

अर्जाचं शुल्क

एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याशिवाय, इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. 

हे ही वाचा: पतीला सोडून दीरासोबतच उरकलं लग्न! संतापलेल्या तरुणाने सासरी जाऊन घातला धिंगाणा अन् सासूला...

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम canarabank.bank.in या कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. आता होमपेजवरील Recruitment टॅबवर क्लिक करा. 
3. त्यानंतर, अप्रेन्टिस अप्लाय लिंकवर क्लिक करा. 
4. रजिस्ट्रेशन करून अर्ज भरून घ्या. 
5. नंतर, मागितलेले सर्व डॉक्यूमेंट्स अपलोड करा. 
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. 

मेरिट लिस्ट, स्थानिक भाषा चाचणी, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस टेस्टच्या माध्यमातून अप्रेन्टिसशिप पदावर उमेदवारांची निवड केली जाईल. ही अप्रेन्टिस 12 महिने म्हणजेच एका वर्षासाठी असेल. अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

​​​​​​​

    follow whatsapp