पतीला सोडून दीरासोबतच उरकलं लग्न! संतापलेल्या तरुणाने सासरी जाऊन घातला धिंगाणा अन् सासूला...
एका तरुणाने त्याच्या सासरी जाऊन आपल्या सासूवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीला सोडून दीरासोबतच उरकलं लग्न!

संतापलेल्या तरुणाने थेट सासरी जाऊन केलं भयानक कृत्य...
Crime News: बिहारच्या भागलपुर जिल्ह्यात एका तरुणाने त्याच्या सासरी जाऊन आपल्या सासूवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, आरोपी तरुणाच्या पत्नीने पतीला सोडून दिलं आणि तिच्या दीरासोबतच लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. याच गोष्टीमुळे पती प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या सासूची हत्या केली.
रात्री जावई घरी आला आणि चाकूने...
संबंधित घटना गुरुवारी मधुसूदनपुर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलखोरिया गावात घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील मृत महिला ही शाहकुंड येथील गौरा गावाचे रहिवासी मो. शेख इकबाल यांची पत्नी 55 वर्षीय पत्नी कौशर असल्याची माहिती आहे. संबंधित महिलेला पाच मुली आणि एक मुलगा असून ती तिच्या माहेरी राहत होती. या प्रकरणाबाबत मृत महिलेची मुलगी शबनमने माहिती देताना सांगितलं की गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. त्यावेळी, पीडित महिला घराबाहेर अंगणात झोपली होती. रात्री उशीरा जवळपास दीड वाजताच्या सुमारास तिचा मोठा जावई मो. आफताब शेख तिच्या घरी आला आणि त्याने महिलेच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. घटनेनंतर, आरोपी तरुण तिथून फरार झाला.
महिलेच्या पोटावर चाकूने वार झाल्याने तिथून प्रचंड रक्तस्त्राव होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती. त्यानंतर, कुटुंबियांना जाग आली आणि महिलेला अशा अवस्थेत पाहून घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यावेळी, संबंधित महिलेला भागलपुर येथील मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे ही वाचा: "आमदार, खासदारांनी आर्थिक मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च..." बार्शीतील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल!
मृत महिलेच्या मुलीने तक्रारीत काय सांगितलं?
शबनमने तक्रारीत सांगितलं की पाच वर्षांपूर्वी मुंगेर जिल्ह्यातील अरगंज विशनपुर येथील रहिवासी मो. आफताब नावाच्या तरुणासोबत तिचं लग्न झालं होतं. आपल्या पतीला व्यसन असून तो बऱ्याचदा हुंड्यासाठी तिला मारहाण करत असल्याचे आरोप शबनमने केले. कुटुंबियांनी सुद्धा आफताबला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. त्यांना एक मुलगा झाल्यानंतर, पत्नीला खर्चासाठी पैसे देण्यासाठी सुद्धा आरोपी नकार देत असल्याचं पत्नीने सांगितलं. पतीच्या वागण्याला कंटाळून शबनम तिच्या माहेरी राहत होती. त्यानंतर तिने आफताबसोबत घटस्फोट घेतला आणि सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या धाकट्या भावासोबत म्हणजेच मो. इम्तियाजसोबत तिने दुसरं लग्न केलं. याच कारणामुळे, आफताबच्या मनात त्याच्या आधीच्या पत्नीबद्दल खूप राग होता आणि रागाच्या भरात सासरी जाऊन त्याने सासूला मारून टाकण्याची धमकी देखील दिली होती.