"आमदार, खासदारांनी आर्थिक मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च..." बार्शीतील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल!

मुंबई तक

अतिवृष्टी आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चाला वैतागून एका शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

बार्शीतील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल!
बार्शीतील शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बार्शीतील शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल!

point

मुलाच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाला वैतागून शेतकऱ्याची आत्महत्या

point

अतिवृष्टीमुळे सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी

Farmer Suicide Case in Solapur: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दहिटणे (वैराग) गावात अतिवृष्टी आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चाला वैतागून एका शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. 40 वर्षीय लक्ष्मण काशीनाथ गावसाने अशी मृत तरुणाची ओळख असल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्ती शेती आणि मजूरी करून आपलं घर चालवत होती. 

आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह...

संबंधित घटना बुधवारी सकाळी जवळपास साडे सात वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. लक्ष्मण मंगळवारी दुपारी बाजारात जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला होता. पण, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्या दिवशी, रात्री उशीरा लक्ष्मण बेपत्ता असल्याची तक्रार वैरागी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. मात्र, बुधवारी सकाळीच गावकऱ्यांना बेपत्ता तरुणाचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव, उपनिरीक्षक शिवाजी हाले आणि कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण घटनास्थळी पोहोचले आणि पंचानाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 

मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च 

घटनास्थळी तपासादरम्यान, पोलिसांना मृताच्या खिशातून एक चिट्ठी सापडली. त्यामध्ये लिहिलं होतं की, "आमदार आणि खासदार यांनी आर्थिक मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे म्हणजेच ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी." ही चिट्ठी वाचल्यानंतर मृताच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. मृताची मुलगी जिल्ह्याबाहेर असलेल्या कॉलेजमधून 'बीएससी'चं शिक्षण घेत आहे आणि मुलगा इंजिनीयरिंगचं शिक्षण घेत आहे. दोघांच्याही शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: खळबळजनक... शिंदेच्या नेत्यासह त्याच्या मुलाला ठार करण्यासाठी पवारांच्या NCP नेत्याकडून 4 कोटीची सुपारी?

तसेच, मृत शेतकऱ्याचं कुटुंब केवळ दीड एकर शेतीच्या जमिनीवरच चालत होतं. मागील आठवड्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतातील पिक सुद्धा खराब झालं. यामध्ये पीडित शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. शेतीचं नुकसान, आजारपण आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चाला वैतागून पीडित शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp