खळबळजनक... शिंदेच्या नेत्यासह त्याच्या मुलाला ठार करण्यासाठी पवारांच्या NCP नेत्याकडून 4 कोटीची सुपारी?

मिथिलेश गुप्ता

डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेना नेता आणि त्याच्या मुलाच्या हत्येसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्याने 4 कोटींची सुपारी दिल्याचा आरोप करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

shocking allegations that sharad pawar ncp leader wandar patil was given a money of rs 4 crore to kill eknath shinde shiv sena leader mahesh patil and his son
NCP नेत्याकडून 4 कोटीची सुपारी? (फाइल फोटो)
social share
google news

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळातच मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणामध्ये एकमेकांचे वैमनस्य, सूड आणि प्रतिस्पर्धेतून अनेकदा संघर्ष होताना आपण पाहिला आहे. पण आता थेट 4 कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे कल्याण तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांचा मुलगा आणि उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते वंडार पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'मुलाच्या बदल्यात मुलगा.. म्हणून सुपारी दिली', महेश पाटील यांनी नेमके काय केले आरोप?

विशेष म्हणजे, महेश पाटील यांना वंडार पाटील यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात नुकतंच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती, याच रागातून वंडार पाटील यांनी हा हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर 'बदल्यात मुलगा' या भूमिकेतून महेश पाटील यांच्या मुलाला संपवण्याचाही कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील, मुझम्मिल मलिक बुबेरे (सुपारी घेणारा) अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत हा गुन्हा ठाणे क्राईम ब्रँच कडे वर्ग करण्यात आला आहे. 

वंडार पाटलांनी आरोप फेटाळले

मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, 'आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून अशा प्रकारची कुठली सुपारी आम्ही दिली नाही. मात्र, माझ्या मुलाचा प्रकरणात ज्यांची निर्दोष सुटका झाली त्यांच्याविरोधात आम्ही हायकोर्टात अपील करू नये यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp