Palghar Crime : पालघर जिल्ह्यात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धानसर गावात एका 7 वर्षाच्या मुलावर त्याच्याच आईने चपाती बनवण्याच्या बेलण्याने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचं कारण आता समोर आलं आहे. लहान मुलाने चिकन खाण्याची आईकडे मागणी केली होती. पण, आईने रागाच्या भरात आपल्या पोटच्या लहान लेकावर हल्ला केला असता, लहान मुलाच्या डोक्यावर मोठी जखम झाली असून लहान मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तामिळनाडूमधील रॅलेत चेंगराचेंगरी होऊन 39 जणांचा मृत्यू, विजय थलापतीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
महिलेची 'ती' लज्जास्पद बाब
लज्जास्पद बाब म्हणजे अशी की, आईने आपल्याच पोटच्या मुलाला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान मुलाच्या डोक्यावर जबर मार लागला होता, परिस्थिती पाहून आईनं पीडिताला रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं, पण त्याला रुग्णालयात दाखल केलं नाही. आईने केलेल्या कृत्याने आणि तिचा आपल्या मुलाप्रती असलेल्या निष्काळजीपणामुळे 7 वर्षांच्या मुलाचा घरातच मृत्यू झाल्याचा मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित घटनेची स्थानिकांना माहिती होताच त्यांनी पोलिसांना कळवले.
सांगण्यात येत आहे की, आरोपी महिला ही आपल्या पतीपासून दोन मुलांसह बहिणीसोबत विभक्त राहत होती. या घटनेमुळे मृत मुलाची बहिणीच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुलीला पोलिसांनी डहाणूच्या एका आश्रमात दाखल केले आहे. दरम्यान, आरोपी आईनं मुलाचा खून केल्याचा कबुलीनामा दिला आहे. पण स्थानिकांनी मुलाच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले आहेत.
हे ही वाचा : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...
आता हे स्पष्ट होईल की, मुलाचा मृत्यू मारहाणीनंतर उपचारासाठी रुग्णालयात न दखल केल्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर काही कारणामुळे झाला असल्याचा संशय आहे, पण पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्टता दिली जाईल असं सांगितलं.
ADVERTISEMENT
