धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...

मुंबई तक

धावत्या रेल्वेतून नारळ फेकला, ट्रॅकवरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ ट्रॅकवरील तरुणाच्या डोक्याला लागला

point

डोक्याला नारळ लागल्यानंतर तरुणाचा मृत्यू झालाय.

Mumbai Local News : धावत्या लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पूलावरुन  जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आलीये. नारळ डोक्याला लागल्याने तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी  मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, या तरुणाचा मृत्यू झालाय. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

हेही वाचा :  Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढील 24 तास धोक्याचे, रेड अलर्ट जारी.. अतिमुसळधार पाऊस बरसणार!

पूलावरुन जात असताना नारळ डोक्याला लागला 

अधिकची माहिती अशी की, संजय भोईर नायगावच्या पाणूज बेटावर राहतो. तो शनिवारी सकाळी घरातून साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्याने नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते. दरम्यान, हवामान खराब असल्याने संजय भोईर याने मुंबईला कामावर जाण्यासाठी त्याने भाईंदर खाडीवरील ब्रीजवरुन नायगाव स्टेशन गाठण्याच ठरवलं. पूलावरुन चालत असताना चालू लोकलमधून एका प्रवाशाने नारळ फेकला. तोच नारळ संजयच्या डोक्याला लागला.

हेही वाचा : Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!

हे वाचलं का?

    follow whatsapp