Marathwada Flood : मराठवाड्यातील पूराची (Marathwada Flood) स्थिती अजूनही ओसरलेली नाही. नद्यांना महापूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक आपल्या गावाकडं जाण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी पाण्यातून जाण्याची जोखीम घेतात. त्यामुळे अनेकदा या पाऊलामुळे लोकांना जीव गमवावा लागलाय. मात्र, धाराशिव (Dharashiv Flood) जिल्ह्यात आज वाहत जात असलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवलं आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
तरुण दुचाकीसह प्राण्याचा प्रवाहात वाहत गेला अन्..
धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावाजवळील वाघोली पुलावरून जाताना एक तरुण पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेला. सुदैवाने, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. धाराशिव जिल्ह्यातील आज (दि.28) थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. अधिकची माहिती अशी की, इर्ला गावचा निखिल ढोराळकर हा तरुण मोटरसायकलवरून धाराशिवकडे निघाला होता. त्याने पुलावर पाण्याचा मोठा प्रवाह असताना दुचाकीवरून पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून जोरात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी थेट पाण्याच्या प्रवाहात ओढली गेली. क्षणात दुचाकीसह तरुण पाण्यात वाहून गेला.
ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने वाचवला तरुणाचा जीव
दरम्यान, हा तरुण वाहत जात असल्याची पाहून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली. दोरीच्या सहाय्याने थरारक प्रयत्न करत त्याला बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावामुळे संभाव्य जीवितहानी टळली. मात्र, तरुणाची दुचाकी मात्र पुराच्या प्रवाहात वाहून गेली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे धाराशिव तालुक्यातील नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वाहत्या पाण्यातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
Beed Flood 2025 : हॉटेल पुरात वाहून गेलं, उद्योगाला मोठा फटका | Maharashtra Flood 2025
ADVERTISEMENT
