Maharashtra Weather : राज्यातील भारतीय हवामान (IMD) विभागानुसार 27 सप्टेंबर रोजी राज्यात मान्सून सक्रिय असणार आहे. राज्यात विविध भागांमध्ये हवामान विभागाने हलका ते मध्यम मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच काही ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 26 सप्टेंबर 2025 रोजी हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ लंडनला पळाला, इंग्लंडमध्ये कोट्यावधींची माया जमवली; मुलाचंही तिकडेच शिक्षण सुरु
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरात हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी पुण्यातील घाट माथ्यावरील परिसर, कोल्हापूर घाटमाथ्यावरील परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश होतो. तसेच यापैकी जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच परभणी, हिंगोली आणि बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : शेजाऱ्यानेच लहान मुलाला फिरायला नेले, नंतर त्याचं अपहरण करत गळा चिरला, नंतर मृतदेह पोत्यात भरून घरासमोर लटकवला
विदर्भ विभाग :
विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांच्या गडगडाटासह पावसाची हवामान विभागाने शक्यता केली आहे.
ADVERTISEMENT
