पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ लंडनला पळाला, इंग्लंडमध्ये कोट्यावधींची माया जमवली; मुलाचंही तिकडेच शिक्षण सुरु

मुंबई तक

Pune Gangster Nilesh Ghayawal : पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ लंडनला पळालाय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ लंडनला पळाला

point

इंग्लंडमध्ये कोट्यावधींची माया जमवली

Pune Gangster Nilesh Ghaiwal : पुणे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील  वाँटेड आणि कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ लंडनला पळून गेलाय. सध्या त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई सुरू आहे. मात्र, असा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलाय.  गंभीर गुन्हे – खून, खंडणी, अपहरण आणि मारहाण – या आरोपांमध्ये अडकलेला घैवाळ भारताबाहेर कसा गेला? असा प्रश्न विचारला जातोय. निलेश घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केलेला नाही, ज्यामुळे व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा : शेजाऱ्यानेच लहान मुलाला फिरायला नेले, नंतर त्याचं अपहरण करत गळा चिरला, नंतर मृतदेह पोत्यात भरून घरासमोर लटकवला

घायवळविरुद्ध लुकआउट नोटीस जारी

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोथरूड गोळीबार प्रकरणातील घैवाळ व त्याच्या टोळीतील आणखी नऊ जणांवर मोक्काच्या तरतुदी लागू केल्या आहेत. हा गोळीबार पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100–200 मीटर अंतरावर करण्यात आला होता. कोथरूड येथील मुठेश्वर मित्र मंडळाजवळ 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता  हा गोळीबार झाला होता. पीडित प्रकाश मधुकर धुमाळ (३६, थेऊरगाव) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. धुमाळ रस्त्यावर बोलत असताना त्याने दुचाकीस्वाराचा रस्ता अडविल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आलं होतं. आतापर्यंत आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चाडीलकर, फाटक आणि व्यास यांना अटक करण्यात आली आहे, तर इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे. घायवळविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून तो भारतात परतल्यास ताब्यात घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 3 वर्ष उलटूनही शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल कशामुळे प्रलंबित? आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर धनंजय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

हे वाचलं का?

    follow whatsapp