शेजाऱ्यानेच लहान मुलाला फिरायला नेले, नंतर त्याचं अपहरण करत गळा चिरला, नंतर मृतदेह पोत्यात भरून घरासमोर लटकवला

मुंबई तक

crime news : शेजारी राहणाऱ्यानेच लहान मुलाला बाहेर फिरायला घेऊन जातो असे सांगितलं आणि नंतर त्या लहान मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याच्याच घराला लटकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेजाऱ्यानेच शेजारी राहणाऱ्या लहान मुलाचा केला खून

point

असा केला घटनेचा तपास

crime news : आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून देशातील मोठ मोठ्या शहरांमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली आहे. शेजारी राहणाऱ्यानेच लहान मुलाला बाहेर फिरायला घेऊन जातो असे सांगितलं आणि नंतर त्या लहान मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून त्याच्याच घराला लटकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे घडली आहे. या घटनेनं सर्वच हादरून गेले आहेत.

हे ही वाचा : मुस्कानने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा खून करत निळ्या ड्रममध्ये टाकले, आता तुरुंगातच करते नवरात्रौत्सवाचा उपवास, बदल पाहून सर्वच थक्क झाले

शेजाऱ्यानेच आलम साहेबाचा केला खून

आझमगडमधील पठाण टोला येथील रहिवासी असलेल्या मुकर्रम अली यांच्या साहेब आलम (वय 7) याचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खून केला आहे. साहेब आलम हा बुधवारपासून सायंकाळी घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्या रात्री घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

पोत्यात आढळला मृतदेह

दरम्यान, गुरुवारी दुपारी साहेब अलीचा मृतदेह एका पोत्यात आढळला होता. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलीस, फॉरेन्सिक, श्वानपथक आणि पाळत ठेवणाऱ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि तपास करू लागले. जिथं मृतदेह सापडला त्याच जागेच्या समोरील घरात पोलिसांना रक्ताचे डाग आढळले. तेव्हा मृताच्या पीडिताने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शेजारी शैलेंद्र निगम यांच्यावर हत्येचा आरोप करत मृतदेह शेजारच्या घराच्या दारावर लटकवला. या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची एकूण परिस्थिती पाहता, रस्ता रोखून लोकांनी निषेध केला. त्यानंतर मृतदेह सापडण्यापूर्वी त्यांना खंडणीचा फोन आल्याचा दावा मृताच्या कुटुंबियांनी केला होता. त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली, तरीही पोलिसांनी साहेब आलमला शोधण्यास कोणतेही प्रयत्न केला नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp