Laxman Hake, अहमदनगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या कारवर अहमदनगरमध्ये हल्ला करण्यात आलाय. हाकेंच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील आरणगावच्या बाहेरील रस्त्यावरुन नाश्ता करुन लक्ष्मण हाके फोर्ड या कारमधून पुढे जात होते. यावेळी अज्ञात तरुणांनी लाठ्या-काठ्या घेत कारवर हल्ला केलाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके यांनी आज (दि.27) अहमदनगरमध्ये सभेचं आयोजन केलं होतं. दरम्यान, सभास्थळी पोहोचण्याआधीच ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
हल्ला झाल्यानंतर लक्ष्मण हाके काय म्हणाले?
आम्ही दौंड मार्गे आहिल्यानगर बायपासवरुन येत असताना सारंगी हॉटेलसमोर 10 ते 12 लोकांनी आमच्या गाडीवर हल्ला केला आहे. आमच्यासोबत पोलीस असतानाही त्यांनी मोठे बांबू आणले. आमच्या दोन्ही गाड्यांवर त्यांनी बेछुट हल्ला केला आहे. आजवरचा माझ्यावर नऊ वेळा हल्ले झाले आहेत. महाराष्ट्र शासनाला याची कोणतीही फिकिर नाही. आम्ही ओबीसी आरक्षण वाचवा म्हणतोय हा आमचा गुन्हा आहे का? असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
लक्ष्मण हाके यांच्या मुलाच्या कारवरही झाला होता हल्ला
दरम्यान, कारवर हल्ला झाल्यानंतर हल्ला झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांची सभा होणार की नाही? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. मात्र, हाकेंकडून याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. मागच्या अनेक दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं. शिवाय लक्ष्मण हाके यांच्या मुलाच्या कारवर देखील अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता.
अहमदनगरमधील सभा आणि लक्ष्मण हाकेंची पोस्ट चर्चेत
दरम्यान, अहमदनगरमधील सभेपूर्वी लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही. उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो.
हेही वाचा : लग्नानंतर 45 दिवसात संसार मोडला, पोटगीसाठी 45 लाख मोजले; पुण्यातील महागडा घटस्फोट चर्चेत
ADVERTISEMENT
