ADVERTISEMENT
Maharashtra Weather : राज्यात विविध भागांत भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 26 सप्टेंबर 2025 रोजी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील विविध भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, विशेषतः कोकण आणि मराठवाडा विभागात अधिक पावसाचा अंदाज आहे. एकूण पावसाच विभागनिहाय अंदाज खालीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे ते जाणून घ्या.
हे ही वाचा : 'मतचोरीच्या विरोधात योग्य वेळी सर्जिकल स्ट्राईक करेन, ती वेळ आताच सांगणार नाही', आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होतो. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमानाचा अंदाज हे 28-32 अंश सेल्सिअस आहे. तर किमान तापमानाचा अंदाज हा 24-26 अंश सेल्सिअस असणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी पुणे आणि नाशिकमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. या विभागात कमाल तापमान हे 27-31°से, तर किमान तापमान हे 22-25°से तापमानाची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. या भागातील कमाल तापमान हे 28-32, तर किमान तापमान हे 23-26 अंश सेल्सिअस असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : शेजारी राहणाऱ्या तरुणीला अंघोळ करताना बघायचे होते, तरुणाने तिच्या बाथरुममध्ये लावला हिडन कॅमेरा, नंतर रोजच...
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागातील नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
