'मतचोरीच्या विरोधात योग्य वेळी सर्जिकल स्ट्राईक करेन, ती वेळ आताच सांगणार नाही', आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई तक

Aditya Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मतांच्या चोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

Aditya Thackeray
Aditya Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आदित्य ठाकरेंचं मतांच्या चोरीबाबत मोठं भाष्य

point

नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मतांच्या चोरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या चोरीचा खुलासा नक्की करेन, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील वोट चोरी संदर्भात आम्हीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. ते म्हणाले की, आम्ही मागील वर्षी मतदारांची अचानकपणे वाढलेल्या लोकसंख्येबाबत पत्र लिहिले होते. या एकूण अनियमिततेबद्दल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला सर्व काही सांगणार आहोत.

हे ही वाचा : माझे पप्पा गेले, कोणाचेही जाऊ नयेत; अतिवृष्टीमुळे शेतकरी बापाचं टोकाचं पाऊल, लेकीनं फोडला हंबरडा

मतदान चोरीचा खुलासा कधी करणार? 

आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले की, संबंधित प्रकरणात सर्व खुलासा कधी केला जाईल? त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ते त्यांच्या सर्जिकल स्ट्राईकची वेळ आताच सांगणार नाहीत. युवा सेना नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे 25 सप्टेंबर रोजी गुरुवारी मुंबईतील इंडिया डुटे कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झाले असता, त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीदरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका, तसेच आगामी येणारी महापालिका निवडणूक आणि शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या वादावरून आपले विचार उघडपणे मांडले आहेत.

एकनाथ शिंदेंचं नाव न घेताच सडकून टीका

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला काही प्रमाणात त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. याबाबतची एकूण माहिती आम्ही जनतेसमोर जरूर सादर करणार आहोत. जानेवारीत मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी सरकारवर घणाघात घातला असता म्हणाले की, आम्हाला निवडणूक निकाल मान्य आहे, पण हे सरकार नीटसं काम का करत नाही? तुम्हाला डीसीएम (उमुख्यमंत्री) कधी गावी दिसतात तर कधी दिल्लीत तक्रार करताना दिसतात, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेताच त्यांना चांगलंच डिवचलं आहे. 

भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे काय म्हणाले? 

भाजपसोबत उद्धव ठाकरे जाण्याबाबतच्या संभाव्य चर्चेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकार ज्या पद्धतीने चालवलं जात आहे, यामुळे भाजपसोबत जाण्याची चर्चा अशक्य आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आमचं कधीही वाईट नव्हतं. तसेच आमचे राहुल गांधींशी देखील तितकेच चांगले संबंध होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर देखील भाष्य केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp