Govt Job: काय सांगता? रेल्वेत 8000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती! 'या' पदांसाठी लवकरच करा अप्लाय...

रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून NTPC भरती 2025-26 साठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

रेल्वेत 8000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती!

रेल्वेत 8000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती!

मुंबई तक

• 01:11 PM • 26 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वेत 8000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती!

point

कधीपासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात?

Govt Job: रेल्वेत नोकरी मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून NTPC भरती 2025-26 साठी शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. यावेळी, एकूण 8,875 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार असल्याचं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. या पदांमध्ये स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कमर्शियल क्लर्क, अकाउंट्स क्लर्क, जुनिअर टायपिस्ट, ट्रेन्स क्लर्क, सीनिअर क्लर्कसह टायपिस्ट, ट्रॅफिक असिस्टंट सारख्या इतर पदांचा समावेश आहे. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 5,817 पदे आणि 12 वी उत्तीर्ण तरुणांसाठी 3,058 पदे निश्चित करण्यात आली आहेत. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून 12 वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते ग्रॅज्युशनची डिग्री असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

वयोमर्यादा 

या भरतीमध्ये अंडरग्रॅज्युएट लेव्हल पदांसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ग्रॅज्युएट लेव्हल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी 33 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय,  सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील (SC, ST, OBC, PwD आणि माजी सैनिक) उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोग (7th CPC) नुसार, वेतन मिळेल. 

हे ही वाचा: मुंबई: "लहानपणापासूनच टॉर्चर..." संतापलेल्या तरुणाने वडील आणि आजोबांसोबत केलं 'ते' कृत्य अन् काकांना सुद्धा...

RRB NTPC पदांसाठी उमेदवारांची भरती विविध टप्प्यांतून केली जाईल. 

कंप्यूटर आधारित टेस्ट (CBT-1 आणि CBT-2)
पदानुसार, कौशल्य चाचणी (स्किल टेस्ट), टायपिंग टेस्टट किंवा अॅप्टिट्यूड टेस्टट
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस टेस्ट

हे ही वाचा: Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांची चिंताच मिटली! भारत सरकारच्या कंपनीत मिळवा नोकरी, कधीपर्यंत कराल अर्ज?

कसा कराल अर्ज? 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, SC, ST, PwD प्रवर्गातील उमेदवारांना, यासोबतच महिला  आणि माजी सैनिक उमेदवारांना केवळ 250 रुपये अर्जाचं शुल्क आकारण्यात येईल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना 'आरआरबी'च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन NTPC 2025 अर्जाच्या लिंकवर जाऊन क्लिक करावं लागेल. त्यानंतर, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरून घ्या. आवश्यक माहिती भरल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. शेवटी अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. 

    follow whatsapp