Govt Job 2025: सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) कडून वेगवेगळ्या विभागांसाठी जूनिअर एक्झिक्यूटिव्ह (JE) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. खरंतर, संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव नसलेले म्हणजेच फ्रेशर्स तरुण सुद्धा या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना www.bemlindia.in या BEML च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
या पदांसाठी निघाली भरती
या भरतीच्या माध्यमातून एकूण 119 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जेई मेकॅनिकल (JE Mechanical)- 88 रिक्त पदे
- जेई इलेक्ट्रिकल (JE Electrical)- 18 रिक्त पदे
- जेई मेटलर्जी (JE Metallurgy)- 02 रिक्त पदे
- जेई आयटी (JE IT)- 01
- जेई फायनान्स (JE Finance)- 08 रिक्त पदे
- जेई राजभाषा- 02 रिक्त पदे
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं कमाल वय 29 वर्षे असणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'इंजिनीअरिंग'चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! कसं ते सविस्तर जाणून घ्या
काय आहे पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान 60 टक्के गुणांसह इंजिनीअरिंगची फूल टाइम, फर्स्ट क्लास डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, जेई फायनान्स पदासाठी सीए इंटर/ सीएमए इंटर/ एमबीए फायनान्स अशी पात्रता असलेले उमेदवार अप्लाय करू शकतात. तसेच, जेई राजभाषा पदासाठी हिंदी किंवा इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन (MA)ची डिग्री असलेले उमेदवार पात्र ठरतील. संबंधित क्षेत्रात 1 ते 2 वर्षांचा अनुभव असलेले तसेच, फ्रेशर्स कॅन्डिडेट्स सुद्धा अर्ज करू शकतील.
हे ही वाचा: मुंबईची खबर: CSMT ते ठाणे दरम्यान मेट्रो सुरू होणार... मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा! तारीख सुद्धा ठरली?
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम www.bemlindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. नंतर, Career सेक्शनमध्ये जूनिअर एक्झिक्यूटिव्ह पदाशी संबंधित लिंक दिसेल. त्याच्या बाजूला Apply Online टॅबवर क्लिक करा.
4. आता स्क्रीनवर अॅप्लिकेशन विंडो ओपन होईल.
5. त्यानंतर, योग्य ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
6. प्राप्त रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून लॉगिन करा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
7. आता बॉक्समध्ये आवश्यक डिटेल्स भरा. त्यानंतर, फोटो आणि सही स्कॅन करून योग्य साइझमध्ये अपलोड करा.
शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी फॉर्मची प्रिंटआउट सुरक्षितरित्या ठेवा. फिक्स्ड टर्म बेस वर ही भरती होणार असून उमेदवार यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकतात.
ADVERTISEMENT











