Govt Job: 'इंजिनीअरिंग'चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! कसं ते सविस्तर जाणून घ्या
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून ट्रेनी इंजीनिअर पदाच्या एकूण 610 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी आज 24 सप्टेंबर 2025 पासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'इंजिनीअरिंग'चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी...

'या' पदांसाठी निघाली मोठी भरती
Govt Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून ट्रेनी इंजीनिअर पदाच्या एकूण 610 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी आज 24 सप्टेंबर 2025 पासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर म्हणून नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा तरुणांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, 7 ऑक्टोबर 2025 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
पात्रता
ट्रेनी इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीई (B.E), बीटेक (B.Tech) किंवा बीएससी (B.Sc) मध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे पदासाठी निश्चित केलेल्या पात्रता देखील असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: संपत्तीचा वाद टोकाला पोहोचला! पोटच्या मुलानेच बिझनेस पार्टनरसोबत मिळून... मुंबईतील व्यावसायिकासोबत काय घडलं?
किती मिळेल वेतन?
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 35,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 40,000 रुपये वेतन दिलं जाईल.