संपत्तीचा वाद टोकाला पोहोचला! पोटच्या मुलानेच बिझनेस पार्टनरसोबत मिळून... मुंबईतील व्यावसायिकासोबत काय घडलं?
मुंबईतील कांदिवली परिसरात पोलिसांनी एका व्यक्तीला 70 वर्षीय वृद्ध व्यावसायिकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी मुलाने सुपारी किलरला सुपारी देऊन आपल्या वडिलांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पोटच्या मुलानेच बिझनेस पार्टनरसोबत मिळून केली वडिलांची हत्या

मुंबईतील व्यावसायिकासोबत काय घडलं?
Mumbai Crime: मुंबईतील कांदिवली परिसरात पोलिसांनी एका व्यक्तीला 70 वर्षीय वृद्ध व्यावसायिकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी मुलाने सुपारी किलरला सुपारी देऊन आपल्या वडिलांची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पोलिसांकडून मृताचा मुलगा आणि त्याच्या बिझनेस पार्टनरला अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही वरून आलं उघडकीस...
प्रकरणातील मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद सैय्यद (70) असून ते कांदिवलीच्या चारकोपमधील सरकारी औद्योगिक क्षेत्रात एक धातू कारखाना चालवत होते. रविवारी सकाळी, सैय्यद नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्यात गेले होते. मात्र, त्या दिवसी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर बरेच चाकूचे वार आढळले.
तपासादरम्यान, पोलिसांना रविवारी सकाळी दोन व्यक्ती कारखान्याच्या परिसरात घुसताना दिसल्या. सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेसंबंधी बरेच पुरावे समोर आले. सैय्यदवर चाकूने जीवघेणा हल्ला होण्याच्या जवळपास 1 तास आधी कारखान्याच्या आतच असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमधून समोर आलं. हत्येनंतर हल्लेखोरांनी हत्यार कारखान्यातील एका पाण्याच्या टाकीत फेकून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासादरम्यान, पोलिसांनी हत्यार ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: 'त्या' रात्री विवाहिता दाजीसोबतच झाली फरार! पती रडत-रडत थेट पोलिसात... नेमकं काय घडलं?
पोलिसांनी हल्लेखोराला केली अटक
एका विशेष पथकाकडून नवी मुंबईमध्ये हल्लेखोराला अटक करण्यात असून मोहम्मद इस्लाम (26) अशी आरोपीची ओळख असल्याचं समोर आलं आहे. संबंधित आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याची पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला सुपारी देणाऱ्या व्यक्तींबद्दल विचारलं असता त्याने मृताचा मोठा मुलगा हमीद सैय्यद (41) आणि त्यांचे बिझनेस पार्टनर शानू चौधरी (40) यांचं नाव समोर आलं.