Marathwada flood : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे. या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहेत. एवढंच नाही,तर या अतिवृष्टीत मराठवाड्यात दोन दिवसांपूर्वीचा मृतांचा आकडा 8 वर गेला होता. तर काही शेतकऱ्यांनी या पूरजन्य स्थिती आणि कर्जबारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे अनेकांची मुलं बाळं वनवासी झाली आहेत. अनेक लहान मुला बाळांनी सरकारकडे आर्त हाक दिली आहे. अशीच एक घटना मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील किर गावातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शेजारी राहणाऱ्या तरुणीला अंघोळ करताना बघायचे होते, तरुणाने तिच्या बाथरुममध्ये लावला हिडन कॅमेरा, नंतर रोजच...
लेकीची सरकारला आर्त हाक
धाराशिव जिल्ह्यातील कारी गावात मन हेलावून टाकणाऱ्या शेतकरी बापाच्या लेकीनं सरकारला आर्त हाक दिली आहे. माझे पप्पा जसे गेले तसे कोणाचेही जाऊ नये, असं म्हणत मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. सध्या राज्यातील मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसाने शतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. अख्खं सोयाबीन, कांदे इतर पिके पाण्यात वाहून गेली आहेत. सध्या नेते मंडळी हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. पण, याच नेत्यांच्या अनेक गाड्या शेतकऱ्यांनी आडवलेल्या आहेत, यामागे शेतकऱ्यांचा रोष असल्याचं दिसून येतं.
डोळ्यात पाणी अन् ओठात बापाची कहाणी
किर गावातील एका लहान मुलीनं आपल्या शेतकरी वडिलांची कहाणी सांगितली. माझ्या वडिलांना पंधरा पंधरा मिनिटे फोन असायचे. सकाळ झाली की, त्यांना फोन यायला सुरुवात व्हायची. सुट्टीच्या दिवसी रानात आलो की, पप्पा आमच्या गळ्यात पडून रडायचे. कोणाचा फोन येतोय? असा प्रश्न केल्यावर ते काहीच सांगत नव्हते. ते सतत सर्व गोष्टी गिळून घेत होते कोणाला काही बोलत नव्हते, शेवटी त्यांनी सहन केलं आणि नंतर असं केलं, असं म्हणत पीडित मुलीच्या डोळ्यातून अश्रूंदा बांधा फुटला.
हे ही वाचा : देवाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरबाजीची सांगितली 'ती' आतली गोष्ट, नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात भीषण परिस्थिती दिसून येत आहे. अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे. लहान मुलांच्या शिक्षणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू या पूरात वाहून गेल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
