देवाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरबाजीची सांगितली 'ती' आतली गोष्ट, नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadanvis : इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून भारतातील विचार आणि संवादासाठी सर्वात निर्णायक मंच सज्ज आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. याच मुलाखतीच्या माध्यमातून फडणवीसांनी देवाभाऊच्या बॅनरमागचं गोष्य सांगितली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

देवाभाऊच्या पोस्टरमागचं खरं कारण काय?
Devendra Fadanvis : इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून भारतातील विचार आणि संवादासाठी सर्वात निर्णायक मंच सज्ज आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे मुलाखत झाली. या मुलाखतीच्या माध्यमातून फडणवीसांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. या मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून मुंबई तकचे संपादक साहिल जोशी, तसेच मारिया शकील यांनी आपली भूमिका बजावली आहे. या मुलाखतीत साहिल जोशी यांनी देवेंद्र फडणवीसांच्या देवाभाऊ बॅनरबाजीवरून प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी बॅनरबाजीच्या आतली गोष्ट सांगितली आहे.
हे ही वाचा : पती-पत्नी करत होते हॉलमध्ये आराम, 40 वर्षे जून्या इमारतीचा कोसळला स्लॅब, वसईत नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस हे बॅनरमध्ये एकटेच का?
देवेंद्र फडणवीस हे बॅनरमध्ये एकटेच दिसत आहात. ते एकटेच त्या बॅनरमध्ये दिसत आहेत एकटेच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय असं विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या वैज्ञानिक युगातही काही पोस्टर किती पावरफुल गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, त्याला एक महत्त्व देणं गरजेचं आहे. पोस्टरमध्ये मी माझ्या नावाचा कुठेही उदोउदो केला नाही. मी त्यात मला मतदान करा अशीही मागणी केली नाही, असे असलं तरीही काही लोकांना मिरची लागते. काही लोकांना या विषयावर वाद घालायला सुरुवात केली.
मिरची नेमकी कोणाला लागली?
त्यानंतर साहिल जोशी यांनी याच मुद्दयाला धरून प्रश्न केला की, मिरची नेमकी कोणाला लागली? तुमच्या नेत्यांना की बाहेरच्या? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या नेत्यांना नाही,तर बाहेरच्या नेत्यांनाच मिरची लागलेली आहे. आमच्या नेत्यांना केवळ मिठाई देण्यात आल्याचं म्हणत फडणवीसांनी मिश्कील उत्तर दिलंय.