पती-पत्नी करत होते हॉलमध्ये आराम, 40 वर्षे जून्या इमारतीचा कोसळला स्लॅब, वसईत नेमकं काय घडलं?
Vasai Slab collapes : वसई पश्चिमेत एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिनदयाल परिसरातील तिरुपती सोसायटीतील बी विंगमध्ये 205 या फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वसई पश्चिमेत एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार

स्लॅब कोसळल्याने भीषण अपघात

नेमकं काय घडलं?
Vasai Slab collapes : वसई पश्चिमेत एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिनदयाल परिसरातील तिरुपती सोसायटीतील बी विंगमध्ये 205 या फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात 24 सप्टेंबर रोजी दुपारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात पती आणि पत्नी दोघेही गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. संबंधित इमारत ही गेली 40 वर्षांपूर्वी जुनी होती.
हे ही वाचा : कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार, हवामान विभागाचा अंदाज काय?
इमारतीचा स्लबॅ कोसळून पती पत्नी गंभर जखमी
या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आता समोर आली आहे. या अपघातात पत्नी मेरुनिसा विरानी आणि पती सलीम विरानी गंभीररीत्या जखमी झाल्याचं समजतंय. या अपघातात मेरुनिसा विरानीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर पतीच्या खांद्यालाही गंभीर दुखापत झाल्याचं समजतंय. ही इमारत गेली 40 वर्षांपासून जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील काही फ्लॅटच्या छताचा भाग कोसळल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
अमेरिकेहून परतले होते दाम्पत्य
दरम्यान, विरानी कुटुंब हे काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून परतले होते. ते दीड ते दोन महिने अमेरिकेत होते. ते दहा दिवसांपूर्वी भारतात परतल्याचं सांगण्यात येत आहे. ते परतल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत ते थोडक्यात बचावले गेले. या घटनेनं वसई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.